दक्षिण आफ्रिका क्रिकेटवर मोठ संकट; मंडळ बरखास्त करुन सरकार होणार कारभारी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 September 2020

यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात वर्णभेदाच्या मुद्यावरुन दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठी किंमत चुकवावी लागली होती. तब्बल 22 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर आता सरकारच्या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात येऊ शकते. 

दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटवर पुन्हा एकदा मोठे संकट ओढावले आहे. दक्षिण आफ्रिकेतील सरकारने क्रिकेट बोर्ड बरखास्त करत संपूर्ण संघटना आपल्या नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला आहे.  क्रिकबजच्या वृत्तानुसार,  दक्षिण आफ्रिका क्रीडा महामंडळ आणि ओलंपिक समितीने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून  सीएसए बोर्डाच्या (दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड)  वरिष्ठ अधिकाऱ्यांना  सीएसए प्रशासनावरुन हटण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

यासंदर्भातील संपूर्ण बातमी आणि क्रीडा क्षेत्रातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

दक्षिण आफ्रिका संघाच्या संदर्भात तेथील सरकारने  घेतलेला हा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या नियमात न बसणारा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना सरकारी हस्तक्षेपामुळे दक्षिण आफ्रिका संघावर  बंदीची कारवाई करु शकते. याप्रकरणात आयसीसी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी क्रिकेटच्या मैदानात वर्णभेदाच्या मुद्यावरुन दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठी किंमत चुकवावी लागली होती. तब्बल 22 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने त्यांच्यावर बंदी घातली होती. 

ब्रावोचा CPL-IPL चा 'तो' योगायोग जुळला तर यंदा युएईत धोनीच्या हातात दिसेल ट्रॉफी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South African Olympic body removes CSA board takes control of cricket