esakal | दक्षिण आफ्रिकेच्या 'या' वेगवान गोलंदाजाची निवृत्तीची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Vernon Philander

34 वर्षीय फिलँडरने आज (मंगळवार) निवृत्तीची घोषणा केली असून, त्याने आतापर्यंत 97 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या 'या' वेगवान गोलंदाजाची निवृत्तीची घोषणा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नोन फिलँडर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी त्याची अखेरची कसोटी ठरली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

34 वर्षीय फिलँडरने आज (मंगळवार) निवृत्तीची घोषणा केली असून, त्याने आतापर्यंत 97 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. त्याने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 261 बळी त्याच्या नावावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.

इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या कसोटीत 191 धावांनी पराभव झाला असून, त्यांना मालिका 3-1 ने गमवावी लागली आहे. इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर बाद झाल्यानंतर फिलँडरने आक्षेपार्ह सेलिब्रेशन केल्याने त्याला दंडही करण्यात आला आहे. फिलँडरने ही मालिका सुरु होण्यापूर्वीच ही त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्याचे स्पष्ट केले होते.