महिला अन् कुस्ती हे समीकरण समाजाला मान्य नव्हतं, पण...

महाराष्ट्राच्या महिला कुस्तीची सुवर्ण पहाट
Vinesh Phogat
Vinesh Phogat File Photo

Women Wrestling : काही वर्षांपुर्वी महिला कुस्तीवर आधारित 'दंगल' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला अन् बघता बघता जणु काही महिला कुस्तीचं रणशिंगच फुंकलं गेलं. महिला कुस्तीचा एकच गाजावाजा झाला. केवळ महाराष्ट्रातच नाही देशभरातल्या तालमींमध्ये महिलांसाठी मॅट घातले जाऊ लागले. पण महाराष्ट्रात 1996 सालापासुनच 'दंगल' सुरु होती. केवळ शारिरीकच नाही तर मानसिक पातळीवरही महFला कुस्तीगिरांना लढावं लागत होतं. प्रोत्साहन नाही, मार्गदर्शनाचा अभाव, सुविधांची वानवा अशाही परिस्थितीत चित्रा मुरादे, अंजली देवकरे आणि संध्या पाणबुडे यांनी राष्ट्रीय स्तरापर्यत धडक मारली. महाराष्ट्रात महिला कुस्तीचा पहिला बिगुल 1996 साली यांनीच प्रथम वाजवला.

अन् महिला कुस्तीनं कात टाकायला सुरुवात केली..

महिला आणि कुस्ती हे समीकरणच बहुदा समाजाला मान्य नव्हतं. अगदी क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन यासारख्या खेळांत महीलांनी कोर्ट गजबजु लागले होते. पण कुस्तीमध्ये पहाट अजुन उगवायची होती. महाराष्ट्रात फारसे सामनेही होत नव्हते. जे काही थोडेफार व्हायचे त्यामध्ये महीलांचा फार सहभागही नसायचा. याच दरम्यान महाराष्ट्रात पहीली राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडली ती नागपुरमध्ये. मात्र, तरीही कुस्तीची रुजवात होत नव्हती. मात्र, पंजाब आणि हरियानाच्या महीला कुस्तीपटुंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मारलेली मुसंडी सगऴ्यानांच अचंबित करु लागली. अन 2003 सालापासुन महीला कुस्तीनं कात टाकायला सुरुवात केली.

मुलींसाठीच्या पहिल्या निवासी कुस्ती केंद्राची पुण्यनगरीत रोवली मुहर्तमेढ...

देशात मोठ्या प्रमाणावर मुली कुस्तीकडे आकर्षित होऊ लागल्या. महाराष्ट्रही मागे कसा राहणार? पाहता पाहता हे लोण महराष्ट्रातही पसरलं. मुलींची वाढती संख्या लक्षात घेता आतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी पुढाकार घेत 2005 साली आळंदीला पहील्या महिला कुस्ती निवासी केद्रांची महुर्तमेढ रोवली. जोग महाराज व्यायामशाळा म्हणुन ओळखले जाणारे हे राज्यातले पहीले निवासी कुस्ती संकुल ठरले आहे. सुरवातीला या संकुलात बोटावर मोजण्याइतक्या महीला मल्ल होत्या. आता ही संख्या 80 च्या घरात गेली आहे.

Vinesh Phogat
Video : रोहित शर्मा लागला दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीला

महिला कुस्ती अन् अठरा विश्व दारिद्रय यांचं अतूट नातं..

कुस्ती या क्रीडा प्रकाराची धाटणीच वेगऴी. कुस्तीचा बुस्टर डोस म्हणजे खुराक. एका महीला पैलवानासाठी महीन्याच्या खुराकाचा खर्च अंदाजे दहा हजार रुपयांपर्यत असतो. पण ज्या कुटुंबात जेमतेम दोन वेळच्या जेवणाची तजवीज असेल अशा कुटुंबातुन राष्ट्रीय स्तराच्या मल्ल घडू शकतात का ? तर याचं उत्तर होय असंच द्यावं लागेल. अनिता गव्हाणे हिच्या घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. गावच्या जत्रेत कुस्ती खेऴुन दोन चार रुपये कमवायची. मात्र, आळंदी इथं सुरु झालेल्या जोग महाराज निवासी कुस्ती केंद्रानं तिला मदतीचा हात दिला अन् दिला अन अनितानं राष्ट्रीय स्तरावर डझनभऱ पदकांची लयलुट केली.

Vinesh Phogat
ऑलिम्पिक चॅम्पियन विरुद्ध पंगा; ती कोर्टात पोहचली, अन् जिंकलीही

महाराष्ट्रातल्या लेकींच्या कर्तबगारीचा चढता आलेख...

अगदी सुरवातीला महाराष्ट्रात महिला कुस्तीपटुंची संख्या 50 ते 60 दरम्यान होती ती आता तीन हजारांच्या घरात गेली आहे. अंकीता गुंड सारख्या कुस्तीपटुनं आशियाई पदक पटकावत महाराष्ट्राचं आश्वासक पाऊल टाकलं आहे. जवळपास दोनशे ते तिनशे महीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेत्या ठरल्या आहेत. मुलींसाठीही आता आखाड्यात स्वतंत्र सुविधा उपलब्ध होत आहेत. काही तालमीत महीला स्पर्धेंत उतरण्यापुर्वी पुरुषांबरोबर सराव सामनेही खेऴताना दिसत आहे. मात्र अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

पंजाब, हरियाणाची श्रीमंती आपल्या वाट्याला कधी येणार ?

पंजाब, हरियाणामध्ये घराघरात कुस्तीचं वेड भिनलेलं आहे. गावागावात अद्ययावत कुस्तीसंकुलं आहेत. या राज्यांचा एवढा दबदबा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर दहाच्या दहा वजनी गटात सुवर्णपदकांवर यांचीच मक्तेदारी असते. राज्यसरकार महीला कुस्तीसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेत्या महीला कुस्तीपटुंना थेट सरकारी नोकरीत सामावन घेतले जाते. एवढ्यावरच इथल्या महीलांची कुस्ती थांबत नाही. लग्न झाले तरी अनेकजणी आखाड्यात सराव करताना पहायला मिळतं. गीता फोगट,सरीता मोर यांनी मातृत्वानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली पदकांची कमाई इतरांना प्ररेणा देणारी आहे. महाराष्ट्र या तुलनेत बराच मागे असुन अजुनही आपल्या मुलींना संघर्ष करावा लागतोय. रेश्मा माने, अंकीता गुंड, कौसल्या वाघ आणि सोनाली तोडकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेंडा रोवुन अद्यापही त्यांना नोक-या नाहीत. ही परिस्थिती खचितच मनोधैर्य खचवणारी आहे.

Vinesh Phogat
Ashes : इंग्लंडने सामना, पैसा आणि कमावलेले पॉईंट्सही गमावले

पहाट उजाडलीये.. आता प्रतिक्षा सुवर्णकाळाची..

सर्बिया इथे नुकतीच जागतिक कुस्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये भारतानेही भाग घेतला होता. या सभेकडे जगभरातल्या कुस्तीपटुंचे लक्ष लागले होते. अशातच महीला कुस्तीपटुंसाठी एक दिलासा देणारी बातमी येऊन धडकली ती म्हणजे सर्वांनी मिळुन महीला कुस्तीच्या विकासासाठी एकत्रित प्रय़त्न करणे आणि यासाठीचा धोरणात्मक कार्यक्रम आखुन त्यावर शिक्कामोर्तब करणे असा ठराव एकमुखाने मंजुर करण्यात आला. हा निर्णय म्हणजे पहाट उजाडलीये आता प्रतिक्षा आहे ती सुवर्णकाळाची असेच म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com