उपांत्य फेरीच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) व पृथ्वीराज यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालावरून गालबोट लागले.
Maharashtra Kesari Prithviraj Mohol Interview : अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Championship) पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याने (Prithviraj Mohol) मानाची गदा पटकावली. मात्र, तत्पूर्वी उपांत्य फेरीच्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) व पृथ्वीराज यांच्यात झालेल्या लढतीच्या निकालावरून गालबोट लागले. तसेच अंतिम सामन्यातही प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाड याने शेवटच्या क्षणी मैदान सोडले. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज याच्याशी त्याच्या कुस्ती कारकिर्दीबाबत, ‘महाराष्ट्र केसरी’तील वादाबाबत आणि पुढील वाटचालीबाबत साधलेला संवाद...