
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह सर्व क्रीडा महासंघांच्या कामकाजावर देखरेख करण्याचे व्यापक अधिकार असलेले क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ आज केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांनी लोकसभेत मांडले. क्रीडा महासंघांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या स्थापनेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळाची मान्यता मिळवावी लागेल.