भारतातील मालिकेबाबत आज केंद्राचा निर्णय?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

दक्षिण आफ्रिका "अ' संघाचा भारत दौरा जेमतेम दोन आठवड्यांवर येऊनही त्यास केंद्रीय क्रीडा खात्याने हिरवा कंदील दाखवलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय मंळाचे सीईओ राहुल जोहरी शनिवारी केंद्रीय क्रीडा सचिव राधे शाम झुलानिया यांची भेट घेतील.

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका "अ' संघाचा भारत दौरा जेमतेम दोन आठवड्यांवर येऊनही त्यास केंद्रीय क्रीडा खात्याने हिरवा कंदील दाखवलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय मंळाचे सीईओ राहुल जोहरी शनिवारी केंद्रीय क्रीडा सचिव राधे शाम झुलानिया यांची भेट घेतील.

परदेश संघाच्या भारत दौऱ्यास केंद्राची मंजुरी आवश्‍यक नसते. मात्र संबंधित खेळाडूंना व्हिसा मिळण्यासाठी एक मंजुरीपत्र क्रीडा मंत्रालयाकडून दिले जाते. दक्षिण आफ्रिकेचा "अ' महिला; तसेच वरिष्ठ संघ आगामी काही आठवड्यात भारतात येतील. हे पत्र दौऱ्यापूर्वी 30 ते 45 दिवस अगोदर देण्यात येते. भारतीय मंडळाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी मार्चमध्ये अर्ज केला होता; पण त्याचे पत्र अद्याप मिळालेले नाही.

राहुल जोहरी आता या दौऱ्याच्या; तसेच बांगलादेश आणि वेस्ट इंडीज संघाच्या भारतातील मालिकेबाबत केंद्रीय क्रीडा सचिवांबरोबर चर्चा करतील. ही बैठक निश्‍चित असली, तर केंद्रीय क्रीडा खात्यातील अधिकारी याबाबत सध्या काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र या बैठकीत भारतीय मंडळास आपण स्वतःला वेगळे समजू नका, आमच्यासाठी सर्व क्रीडा संघटना सारख्याच आहेत, सर्व नियमांचे पालन करावेच लागेल, असे बजावले जाण्याची शक्‍यता आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports ministry may take decision about series in india