भारताने टाळला तळाचा क्रमांक

भारताने टाळला तळाचा क्रमांक

इपोह (मलेशिया) - भारताच्या प्रायोगिक संघाला २७व्या अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळाला. आयर्लंडविरुद्ध क्रमवारी निश्‍चितीच्या लढतीत भारताने दमदार खेळ करीत मोठा विजय संपादन केला. शुक्रवारीच भारताने आयर्लंडला विजयाची भेट दिली होती, पण या वेळी कामगिरी उंचावत भारताने सहा संघांच्या स्पर्धेत तळाचा क्रमांक टाळला. भारताने पहिल्या विजयाने सांगता केली.

पाचव्याच मिनिटाला खाते उघडत भारताने पकड घेतली. आक्रमक सुरवात करीत भारताने आगेकूच केली. सीमरनजित सिंगचा फटका अवैधपणे रोखला गेल्यामुळे भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर पहिला प्रयत्न वाया गेला, पण चेंडूवरील ताब्यासाठी चुरस होऊन आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. तो वरुण कुमारने सत्कारणी लावला. दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. यात भारताने चार प्रयत्न नोंदविले. यात ओदीशातील सुंदरगढच्या शिलानंद लाक्राने नीलम संदीप झेस याच्या वेगवान पासवर लक्ष्य साधले. त्याने आयर्लंडचा गोलरक्षक जेमी कारला चकविले. तिसऱ्या सत्रात वरुणने वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यानंतर गुर्जंतने लक्ष्य साधले. सीमरनजतीने ही चाल रचत तलविंदर सिंगला पास दिला. भारताला नंतर एक गोल पत्करावा लागला, पण हा अपवाद वगळता बचाव फळीने चांगली कामगिरी केली.

निकाल
भारत ः ४ (वरुण कुमार ५, ३२, शिलानंद लाक्रा २८, गुर्जंत सिंग ३७) विवि आयर्लंड ः १ (ज्युलियन डेल ४८)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com