esakal | टेनिसपटू सुमीतला चॅलेंजर विजेतेपद
sakal

बोलून बातमी शोधा

टेनिसपटू सुमीतला चॅलेंजर विजेतेपद

टेनिसपटू सुमीतला चॅलेंजर विजेतेपद

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळुर - भारताच्या सुमीत नागलने बंगळूर ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. या पातळीवर त्याने प्रथमच सर्वोत्तम कामगिरी केली. अंतिम सामन्यात त्याने ब्रिटनच्या जेय क्‍लार्क याला ६-३, ३-६, ६-२ असे हरविले. जागतिक क्रमवारीत सुमीत ३२१वा, तर क्‍लार्क २७९वा आहे. या कामगिरीमुळे सुमीतला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीत संधी मिळू शकेल.