क्रीडा जगतात वर्षभरात काय घडलं? एका क्लिकवर...

क्रीडा जगतात वर्षभरात घडलेल्या खास घडामोडींवर एक नजर....
Lookback 2021
Lookback 2021Sakal

Sports Year in Review A Flashback of the Major Events in 2021 : जगभरात कोरोनानं घातलेल्या थैमानामुळे क्रीडा क्षेत्रालाही मोठा फटका बसला. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झालेली मैदाने या वर्षाच्या पहिल्या क्वार्टमध्येच बऱ्यापैकी अनलॉक झाली. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली जगातील मानाची स्पर्धा समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा याच वर्षी पार पडली. क्रिकेटच्या मैदानातील टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही याच वर्षी झाली. याशिवाय युरो आणि कोपा अमेरिका या फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित स्पर्धाही थाटा माटात पार पडल्या. या सर्व स्पर्धा 2020 मध्ये नियोजित होत्या. पण कोरोनामुळे या स्पर्धा यंदाच्या वर्षी खेळवण्यात आल्या. फॉर्म्युला वनच्या शर्यतीत नवा गडी नव राज्य असे चित्र पाहायला मिळाले. टेनिस जगतात वर्षभर दबदबा राखणाऱ्या जोकोविचचे अखेरच्या क्षणी स्वप्न भंगले. दुसरीकडे महिला गटात ग्रँडस्लॅमची नवी सम्राज्ञी मिळाली. नजर टाकूयात या वर्षांत जगभरात क्रीडा क्षेत्रात घडलेल्या खास घडामोडींवर....

ऑलिम्पिक स्पर्धा 2020 ..

जपानमधील टोकियोमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा ही 2020 मध्ये नियोजित होती. पण कोरोनामुळे स्पर्धा स्थगित करण्याची वेळ आली. त्यामुळेच ही स्पर्धा यंदाच्या वर्षी पार पडली असली तरी ती स्पर्धा ऑलिम्पिक 2020 अशीच ओळखली जाईल. 23 जूलै ते 8 ऑगस्ट दरम्यान झालेल्या जगातील मानाच्या स्पर्धेत 206 देशांतील 11 हजार 656 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी आयोजकांनी 20 बिलीयन डॉलर इतका प्रंचड खर्च केला होता. 33 क्रीडा प्रकारात पार पडलेल्या स्पर्धेत अमेरिकेन वर्चस्व गाजवलं. 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्य पदकासह अमेरिकेने ऑलिम्पिक स्पर्धेत 113 पदक जिंकली. त्यांच्यापाठोपाठ चीन दुसऱ्या क्रमांकावर राहिला, 38 सुवर्ण, 32 रौप्य आणि 18 कांस्य पदकासह त्यांनी एकूण 88 पदक मिळवली.

Flashback 2021
Flashback 2021

ऑलिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी ...

भारतासाठीही यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा खास अशीच ठरली. भालाफेक क्रीडा प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळाले. मैदानी खेळात भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा पहिला खेळाडू ठरला. या सुवर्ण पदकासह दोन रौप्य आणि 4 कांस्य पदकासह भारताने 7 पदक जिंकली. यात हॉकी संघाच्या दिमाखदार कामगिरीचाही समावेश आहे. पुरुष संघाने कांस्य पदक मिळवले. दुसरीकडे महिला हॉकी संघ ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदा सेमी फायनलपर्यंत पोहचला. कांस्य पदकाच्या लढतीत महिला संघाने ग्रेट ब्रिटनला तगडी फाईट दिली. त्यांना 4-3 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

Flashback 2021
Flashback 2021 SAI

युरोचा हिरो अन् कोपा अमेरिकेत मेस्सीच्या अर्जेंटिनाचा जलवा...

फुटबॉल जगतातील युरो (EURO 2020) आणि कोपा अमेरिका (Copa America 2021) या प्रतिष्ठित स्पर्धाही यंदाच्या वर्षी पार पडल्या. जवळपास 53 वर्षानंतर इटलीनं युरो चषक उंचावला. दुसरीकडे लिओनेल मेस्सीच्या उपस्थितीत अर्जेंटिनाने पहिल्यांदाच कोपा अमेरिका चषकावर नाव कोरुन मोठी स्पर्धा जिंकली.

Flashback 2021
Flashback 2021

फुटबॉलमधील मानाचा पुरस्कार...

अर्जेंटिना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विक्रमी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराचा मानकरी ठरला. मेस्सीनं बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडोवस्की आणि चेल्सीचा जॉर्जिन्हो यांना मागे टाकले. वर्षांतील सर्वोत्तम क्लबचा पुरस्कार चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीला मिळाला.

Flashback 2021
Flashback 2021

क्रिकेट : ऑस्ट्रेलियाने जिंकला पहिला वहिला -टी-20 वर्ल्ड कप...

भारताने यजमानपद भुषवलेली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये पार पडली. आक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाच्या पदरी निराशा आली. टीम इंडियाला प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. दुसरीकडे सातत्याने दमदार कामगिरी करुन प्रबळ दावेदार मानला गेलेल्या पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाने सेमी फायनमध्ये बाहरेचा रस्ता दाखवला. वर्षभरात ढिसाळ कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिला वहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केले.

Flashback 2021
Flashback 2021

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप...

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाच्या पदरी निराशा आली. साउदम्टनच्या द रोस बाउल स्टेडियमवरील सामना जिंकून न्यूझीलंडने पहिली वहिली ट्रॉफी उंचावली. जूनमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय नोंदवला होता.

Flashback 2021
Flashback 2021 Philip Brown/Popperfoto

क्रिकेटच्या मैदानात गाजलेल्या द्विपक्षीय मालिका...

क्रिकेटच्या मैदानात याशिवाय काही द्वपक्षीय मालिकाही चांगल्याच चर्चेत राहिल्या. यात भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समावेश आहे. पिंक बॉल कसोटीत अवघ्या 36 धावांत ऑल आउट झालेल्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकून सर्वांचे लक्ष्य वेधलं होते. बांगलादेशनने टी-20 मध्ये कांगारुंचा जीव काढला. त्यांनी ऑस्ट्रेलिया 4-1 असा पराभवाचा धक्का दिला.

Flashback 2021
Flashback 2021

आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची हवा...

कोरोनाच्या संकटामुळे 2020 या वर्षात स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात रंगले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचा 14 वा हंगाम गाजवला. त्यांनी चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे.

टेनिस जगतात नोवाक जोकोविचचे वर्चस्व, पण..

सर्बियाच्या नोवाक जोकोविचसाठी 2021 हे वर्ष खास असेच होते. त्याने वर्षांतील चार पैकी तीन ग्रँडस्लमवर नाव कोरले. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत डॅनिल मदवेदेव याला 7–5, 6–2, 6–2 असे पराभूत करत वर्षाची सुरुवात दमदार केली. फ्रेंच ओपनमध्ये त्याने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला 6–7(6–8), 2–6, 6–3, 6–2, 6–4, असे पराभूत केले. तो इथेच थांबला नाही तर विम्बल्डनमध्ये त्याने इटलीच्या मॅट्टेओ बेरेट्टिनी याला 6–7 (4–7), 6–4, 6–4, 6–3. असे पराभूत करुन दाखवलं. सप्टेंबरमध्ये झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत जोकोविचनं फायनल गाठली होती. डॅनिल मेदवेदेव याला पराभूत करुन 1969 नंतर कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्याची त्याच्याकडे संधी होती. पण जोकोविचनं ही संधी गमावली. त्याआधी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवून त्याला या स्पर्धेसह गोल्डन स्लॅम पूर्ण करण्याचीही संधी निर्माण झाली होती. पण तो या दोन स्पर्धेत अपयशी ठरला आणि एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची त्याची संधी हुकली.

Flashback 2021
Flashback 2021

ग्रँडस्लॅमची नवी सम्राज्ञी...

ब्रिटनच्या एमा राडुकानूने अमेरिकन ओपन स्पर्धेत कॅनडाच्या लेला फर्नांडीसचा पराभव केला. महिला एकेरीतील तिची कामगिरी ऐतिहासिक ठरली. अवघ्या 18 व्या वर्षांत एमानं ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. तिच्या रुपात टेनिस जगताला नवी सम्राज्ञी मिळाली.

Flashback 2021
Flashback 2021

फॉर्म्युला वन रेसमध्ये नवा चॅम्पियन...

रेड बुल संघाच्या मॅक्स वेरटॅपेन याने F1 World Drivers Championship स्पर्धेत लुईस हॅमिल्टनला पराभूत करुन दाखवलं. त्यामुळे ब्रिटनच्या लुईसचे आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न धुळीस मिळालं. सलग सहा वेळा हॅमिल्टनने जेतेपद मिळवले होते. त्याच्या या विजयी मालिकेला मॅक्सनं ब्रेक लावला.

Flashback 2021
Flashback 2021

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतची ऐतिहासिक कामगिरी...

भारतीय पुरुष बॅडमिंटनच्या इतिहासात जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत श्रीकांतने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. स्पेनमध्ये पार पडलेल्या स्पर्धेत त्याने फायनल पर्यंत धडक मारली. फायनलमध्ये पराभूत झाल्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तरीही या स्पर्धेत पुरुष गटात सर्वोच्च कामगिरीचा विक्रम किदाम्बी श्रीकांतच्या नावे झाला. भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवण्याचा विक्रम हा पीव्ही सिंधूच्या नावे आहे. महिला एकेरीत सुवर्ण कामगिरीही करुन दाखवलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com