Paris Olympic 2024 hockey
Paris Olympic 2024 hockeysakal

Paris Olympic 2024 : असामान्य योगदानाबद्दल श्रीजेश समाधानी; १८ वर्षांच्या शानदार कारकिर्दीची यशस्वी सांगता

केरळमधील ३६ वर्षीय श्रीजेशची झळाळती कारकीर्द तब्बल १८ वर्षांची आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यापूर्वी त्याने ‘एक्स’वर प्रतिक्रिया व्यक्त केली.
Published on

पॅरिस : भारताचा अनुभवी हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश गुरुवारी अखेरचा सामना खेळला. पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुष हॉकीतील स्पेनविरुद्धच्या ब्राँझपदक लढतीपूर्वी त्याने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द असामान्यपेक्षा कमी नसल्याचे सांगितले, तसेच विश्वास ठेवल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानले.

केरळमधील ३६ वर्षीय श्रीजेशची झळाळती कारकीर्द तब्बल १८ वर्षांची आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यापूर्वी त्याने ‘एक्स’वर प्रतिक्रिया व्यक्त केली. पोस्टसमोर अखेरच्या वेळेस उभे राहताना माझे हृदय कृतज्ञता आणि अभिमानाने फुलून जात आहे. एक तरुण मुलगा ते भारताच्या अभिमानाचे संरक्षण करणारा पुरुष येथपर्यंतचा प्रवास असामान्यपेक्षा कमी नाही, असे त्याने नमूद केले.

श्रीजेश पुढे म्हणतो की, आज मी भारतासाठी अखेरचा सामना खेळत आहे. अडवलेला प्रत्येक फटका, प्रत्येक झेप, प्रेक्षकांची प्रत्येक आरोळी सदोदित माझ्या मनात प्रतिध्वनित असेल. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझी पाठराखण केल्याबद्दल भारताचे आभार. ही अखेर नसून आठवणींची सुरुवात आहे.

Paris Olympic 2024 hockey
India at Paris Olympic 2024 Hockey: भारताकडून ग्रेट ब्रिटनचे 'Shoot Out'! उपांत्य फेरीत थाटात पोहचलो

स्वप्नांचा कायमस्वरूपी रक्षक

ऑलिंपिकमध्ये चौथ्यांदा सहभाग घेण्यापूर्वीच श्रीजेशने निवृत्ती जाहीर केली होती. यावेळच्या स्पर्धेत हा अनुभवी गोलरक्षक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. स्पर्धेत त्याने अविश्वसनीय फटके अडविले आहेत, यामध्ये ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीतील शूटआऊटमधील दोन फटक्यांचा समावेश आहे.

त्यामुळे भारताला सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिकची उपांत्य फेरी गाठता आली. तीन वर्षांपूर्वी त्याने टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताच्या ब्राँझपदक विजेत्या कामगिरीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

Paris Olympic 2024 hockey
Paris Olympic 2024 : पुरुष असल्याचा आरोप झालेली बॉक्सर इमाने खलिफ सुवर्ण जिंकणार? फायनलमध्ये केला प्रवेश

संस्मरणीय विजयांत योगदान

श्रीजेशने २००६ साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर भारताच्या कितीतरी संस्मरणीय विजयांत त्याने योगदान दिले आहे. यामध्ये २०१४ मधील आशियाई क्रीडा स्पर्धा सुवर्ण,

२०१८ मधील जाकार्ता-पालेमबांग येथील एशियाड ब्राँझपदकाचा समावेश आहे. २०१८ साली आशियाई चँपियन्स करंडक विजेत्या, तसेच २०१९ साली भुवनेश्वर येथे झालेल्या एफआयएच मेन्स सीरिज फायनल्स विजेत्या भारतीय हॉकी संघाचा तो सदस्य होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com