जयसूर्या पाठोपाठ संगकारासुद्धा उतरला आंदोलनात, 'भविष्यासाठी..'

श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटूही देशातील जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले आहे.
Sri Lanka Crisis
Sri Lanka Crisissakal

Sri Lanka Crisis: भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती सातत्याने बिघडत असून आता आंदोलक राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत. गोटाबाया राजपक्षे हे त्यांच्या सरकारी निवासस्थानातून पळून गेले आहेत. राजपक्षे यांच्यावर मार्च महिन्यापासून राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. शनिवारी परिस्थिती आणखी बिघडली तर त्याचा परिणाम कोलंबोसह इतर शहरांमध्ये दिसून आला. गालेसह जवळपास सर्वच शहरांमध्ये वाईट परिस्थितीचा परिणाम दिसून येत आहे. श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटूही देशातील जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून येत आहे. (sri lanka crisis sangakkara jayawardena jayasuriya suppport protesters)

Sri Lanka Crisis
श्रीलंकन आंदोलन पोहचलं ऑस्ट्रेलियन मॅचपर्यंत, जयसूर्यासुद्धा उतरला रस्त्यावर

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आंदोलकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. सनथ जयसूर्याही कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ पोहोचले, तिथे आंदोलकांची गर्दी होती.जयसूर्याने स्वतः आंदोलकांसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी नेहमीच श्रीलंकेच्या लोकांसोबत उभा आहे.

माजी कर्णधार कुमार संगकाराने आंदोलकांचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, हे आमच्या भविष्यासाठी आहे. संगकाराचा सहकारी महेला जयवर्धनेनेही त्याचे ट्विट रिट्विट केले. दुसर्‍या ट्विटमध्ये जयवर्धनेने गोटाबाया राजपक्षे यांना #GoHomeGota पद सोडण्याचा सल्ला दिला आहे.

Sri Lanka Crisis
Eng vs Ind 2nd T20I Live: भारताची फलंदाजी सुरू, रोहित-पंत क्रीझवर

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात गाले येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही आंदोलक दिसून आले आहेत. आंदोलकांनी स्टेडियमच्या बाहेर आणि आत पोस्टर फडकावून सध्याच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला. मात्र या सर्व गोष्टींचा सामन्यावर काहीही परिणाम झाला नाही आणि दोन्ही संघांमधील सामना सुरूच राहिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com