Sri Lanka Cricket : नागिन डांस करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूवर एक वर्षाची बंदी! काय आहे प्रकरण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chamika Karunaratne

Sri Lanka Cricket : नागिन डांस करणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूवर एक वर्षाची बंदी! काय आहे प्रकरण...

Sri Lanka Cricket Chamika Karunaratne : श्रीलंका क्रिकेटने स्टार अष्टपैलू चमिका करुणारत्नेवर मोठी कारवाई केली आहे. करुणारत्नेला टी-20 विश्वचषकादरम्यान खेळाडूंच्या कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बोर्डाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून एका वर्षासाठी निलंबित केले आहे. तीन सदस्यीय समितीने केलेल्या शिस्तभंगाच्या चौकशीनंतर एसएलसीच्या कार्यकारी समितीने ही शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा: Suryakumar Yadav : टीम इंडियाचा 360 डिग्री प्लेयर संघातुन बाहेर! मोठे कारण आले समोर...

आपल्या निवेदनात SLC ने म्हटले की, 'चमिका करुणारत्नेच्या उल्लंघनाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी समितीने SLC कार्यकारी समितीला शिफारस केली आहे, खेळाडूला भविष्यात असे न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. यासोबतच अशी शिक्षा द्यावी त्याच्या कारकिर्दीवर फारसा परिणाम होणार नाही. त्याने दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करू नये म्हणून हे करण्यात आले आहे. 

हेही वाचा: W,W,W,W..., टीम इंडियातून बाहेर काढलं, फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये घेतला बदला

बोर्डाने पुढे म्हटले की, 'अशा परिस्थितीत वरील निष्कर्ष आणि चौकशी समितीच्या शिफारशींचे पालन करून कार्यकारी समितीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भाग घेण्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे. याशिवाय करुणारत्नेवर US$ 5000 (रु. 4.08 लाख) चा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात सात सामन्यांत तीन बळी घेतले होते. आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या विजयानंतर त्याने जबरदस्त नागिन डान्स केला. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला होता.