Asia Cup SL vs PAK : पाकिस्तानच्या नांग्या ठेचत लंकेच्या सिंहांची 'जेतेपदाची' गर्जना

Sri Lanka vs Pakistan Asia Cup 2022 Final
Sri Lanka vs Pakistan Asia Cup 2022 Finalesakal

Sri Lanka vs Pakistan Asia Cup 2022 Final

दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले. लंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आला. खराब सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेने नंतर दमदार कमागिरी करत सामन्यावर नियंत्रण ठेवले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. तर अष्टपैलू वानिंदू हसरंगाने फलंदाजीत आक्रमक 36 धावा तर गोलंदाजीत मौल्यवान रिझवानसह 27 धावात 3 विकेट घेतल्या. तर मधुशानने देखील भेदक मारा करत 4 विकेट घेतल्या.

आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंंकेला फलंदाजीला पाचारण केले. मात्र पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद 58 अशी झाली. मात्र त्यानंतर वानुंदू हसरंगा आणि भानुका राजापक्षेने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला 150 धावांच्या पार पोहचवले. हसरंगाने 21 चेंडूत आक्रमक 36 धावा केल्या. तर भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी कले. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान ठेवले.

110-5 : झुंजार रिझवानची झुंज हसरंगाने संपवली

पाकिस्तानचा सलामीवर

102-4 : पाकिस्तानवर वाढला दबाव

प्रमोद मधुशानने पाकिस्तानला अजून एक धक्का देत सेट झालेल्या इफ्तिकार अहमदला 32 धावांवर बाद केले. त्यानंतर करूणारत्नेने मोहम्मद नवाझला 6 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला.

PAK 53/2 (8) : रिझवानची झुंज

पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने डाव सावरत पाकिस्तानला 8 षटकात 53 धावांपर्यंत मजल मारून दिली.

22-2 : मधुशानने पाकला दिले पाठोपाठ दोन धक्के

श्रीलंकेच्या प्रमोद मधुशानने पाकिस्तानला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने चौथ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर कर्णधार बाबर आझमला 5 धावांवर तर पुढच्या तिसऱ्या चेंडूवर फखर झमानला शुन्यावर बाद केले.

पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान 

भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावांची दमदार खेळी करत पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान ठवले. श्रीलंकेने 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या.

भानुका राजपक्षेचे झुंजार अर्धशतक

हसरंगा बाद झाल्यानंतर भानुका राजापक्षेने श्रीलंंकेचा डाव सावरत अर्धशतक ठोकले. त्याच्या या खेळीच्या जोरावर लंकेने 150 ची धावसंख्या पार केली.

116-6 : हारिसने दिला पाकला दिलासा

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने आक्रमक खेळी करत श्रीलंकेला शंभरी पार करून देत चांगला संघर्ष केला होता. मात्र शेवटी हारिस रौऊफने त्याची 21 चेंडूत केलेली 36 धावांची खेळी संपवली.

58-5 :श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी 

पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलकेचा निम्मा संघ 58 धावात माघारी गेला. 21 चेंडूत 28 धावा करणाऱ्या धनंजया डी सेल्वाला इफ्तिकार अहमदने तर कर्णधार दसुन शानकाला 2 धावांवर शादाब खानने बाद केले.

36- 4 : हारिस रौऊफचे दोन धक्के

श्रीलंकेची पॉवर प्लेमध्ये खराब सुरूवात झाली. पाकिस्तानच्या हारिस रौऊफने चौथ्या षटकात पथूम निसंकाला 8 धावांवर तर सहाव्या षटकात दनुष्का गुणतिलकाचा 1 धावेवर त्रिफळा उडवत दोन धक्के दिले.

2-1 : नसीम शाहने दिला पहिला धक्का

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला वेगवान गोलंदाज नसीम शाहने सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर मोठा धक्का दिला. त्याने कुसल मेंडीसाचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

पाकिस्तानच्या संघात दोन बदल

पाकिस्तानने अंतिम सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल केले आहेत. विश्रांती देण्यात आलेल्या शादाब खान आणि नसीम शाह संघात परतले आहेत. तर श्रीलंकेने सुपर 4 मध्ये पाकिस्तानला मात दिलेला संघ कायम ठेवला आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली

श्रीलंकेविरूद्धच्या आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com