

Sri Lankan players departing from Pakistan after the Islamabad bomb blast, citing safety and security concerns.
esakal
Sri Lankan players decide to leave Pakistan : इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पाकिस्ताना दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट टीममध्ये प्रचंड घबराहाट निर्माण झाली आहे. एवढंच नाहीतर आता श्रीलंकेच्या आठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानही सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीलंका क्रिकेटच्या सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे, रावळपिंडी येथे गुरुवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला आहे. इस्लामाबादमध्ये झालेल्या भयानक बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर, श्रीलंकेचा संघ पाकिस्तान आणि झिम्बाब्वेसोबत त्रिकोणी मालिका खेळणार होता. मात्र आता श्रीलंकेच्या खेळाडूंनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्याने ही मालिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालेल आहे.
याशिवाय श्रीलंकेच्या उर्वरीत खेळाडूंनीही त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने आता सांगितले आहे की परतणाऱ्या खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडू पाठवले जातील जेणेकरून संघ भविष्यातील सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकेल.
२००९ मध्ये लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमबाहेर दहशतवाद्यांनी श्रीलंकेच्या संघाच्या बसवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात कर्णधार महेला जयवर्धने, अजंता मेंडिस आणि चामिंडा वास यांच्यासह अनेक खेळाडू जखमी झाले होते, तर अनेक पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. त्या हल्ल्यानंतर, जवळजवळ १० वर्षे कोणत्याही परदेशी संघाने पाकिस्तानचा दौरा केला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.