Badminton Tournament : ग्रामीण क्षेत्रातही बॅडमिंटन खेळ रुजण्याची गरज

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वे; राज्य बॅडमिंटन स्पर्धेला सुरूवात
International badminton player Purva Barve
International badminton player Purva Barve

नांदेड : केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा विषयक योजनेचा लाभ घेत ग्रामीण भागातील युवक, युवतींनी बॅडमिंटन खेळात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पूर्वा बर्वे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. नांदेडला (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वरिष्ठ राज्य बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या पूर्वा बर्वे या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू यांनी संवाद साधला. वयाच्या सात वर्षांपासून बॅडमिंटन खेळात रुजलेल्या पूर्वाने १२ ते १३ वेळेस राज्य अजिंक्यपद, पाच राष्ट्रीय विजेते व सात वेळा उपविजेता पदावर आपले नाव कोरले आहे. तर सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

वय १२ वर्षे असताना, १५ वर्षाखालील गटात ‘इंडिया नंबर वन’ राहण्याचा विक्रमही पूर्वाने केला आहे. मानसिक व शारीरिक क्षमतेला जीवनात महत्व देऊन प्रत्येक सामन्यात स्पर्धा व स्पर्धकाची भीड न बाळगता आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याचे तत्व पूर्वाचं यशाचे गमक ठरले आहे. नांदेड येथे तिने वयाच्या सातव्या वर्षी २००९ ला आपली पहिली स्पर्धा खेळली असून नांदेडशी माझ्या जीवनात विशेष नाते असल्याचेही तिने यावेळी आवर्जून सांगितले.

बॅडमिंटन खेळ ग्रामीणमध्येही रुजावा

बॅडमिंटन हा खेळ महानगर असलेल्या कास्मोपॉलिटीयन भागातच जास्त प्रचलित का आहे? असे विचारले असता पूर्वाने सांगितले की ग्रामीण क्षेत्रातील क्रीडा विषयक जबाबदारी असणाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाची खेलो इंडिया व राज्य शासनाची तालुका क्रीडा संकुल योजना ग्रामीण क्षेत्रासाठी प्रेरणादायक ठरली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात शासनातर्फे बॅडमिंटनचे आधुनिक वूडन कोर्ट उपलब्ध झाले आहेत. तसेच आता क्रीडा क्षेत्र देखील करिअरसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. सायना नेहवाल व सिंधू सर्वासाठी प्रेरणादायक ठरत आहेत. चीन, मलेशिया, कोरिया आदी देशांचा दबदबा भारतीय खेळाडूंनी मोडीत काढला आहे. म्हणजेच गुणवत्तेत आपण कमी नाहीत हे भारतीयांनी सिध्द केले आहे.

परिश्रम व चिकाटी याबाबी ग्रामीण युवक-युवतींमध्ये ठासून भरलेल्या असतात. यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. असे झाले तर ग्रामीण क्षेत्रातून बॅडमिंटन स्टार घडण्यास वेळ लागणार नाही.

- पूर्वा बर्वे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com