Ashes 2019 : स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन नाहीच; तिसऱ्या कसोटीस मुकणार 

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हेडिंग्ले येथे होणाऱ्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी हे जाहीर केले. 

लंडन : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ स्टीव्ह स्मिथ हेडिंग्ले येथे होणाऱ्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी हे जाहीर केले. 

स्मिथने पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतकी खेळी केली होती. दुसऱ्या कसोटीतही पहिल्या डावात तो शतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला होता. मात्र, त्यापूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू मानेला लागून तो जखमी झाला होता. दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावातही तो फलंदाजीला येऊ शकला नाही. त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाने बारावा खेळाडू मार्नस लाबुशेन याला संधी दिली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच राखीव खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली होती. 

स्मिथने चालू मालिकेत तीन डावांत 142, 144 आणि 92 अशा खेळी केल्या आहेत. कसोटी क्रमवारीतही त्याने दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड केली नसली तरी, लाबुशेन याचीच निवड होईल, असे मानले जात आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाल्यावर 59 धावांची खेळी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith to miss 3rd test in ashes 2019