Steve Smith : सचिन, गावसकरांसह तब्बल 10 जाणांना मागे टाकत स्मिथने रचला विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Steve Smith Reached 2nd Spot In Fastest 28 centuries in test cricket List

Steve Smith : सचिन, गावसकरांसह 10 जाणांना मागे टाकत स्मिथने रचला विक्रम

Fastest 28 centuries in test cricket: श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीसामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने दमदार शतकी खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी स्मिथने 212 चेंडूत नाबाद 109 धावा केल्या होत्या. तर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 5 बाद 298 धावांपर्यंत मजल मारली होती. स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) तब्बल 18 महिन्यानंतर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली. स्मिथचे हे कसोटी कारकिर्दितील 28 वे शतक होते. या शतकाबरोबरच स्मिथने कसोटी सर्वात वेगवान 28 शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले.

हेही वाचा: Kamran Akmal : पाक क्रिकेटपटू अकमलचा 90 हजाराचा बकरा गेला चोरीला

स्टीव्ह स्मिथने 87 कसोटी सामन्यात आपले 28 वे शतक पूर्ण केले. या यादीत स्मिथच्या पुढे ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी 48 व्या कसोटी सामन्यात आपले 28 वे शतक ठोकले होते. जरी स्मिथला ब्रॅडमन यांचे रेकॉर्ड मोडण्यात अपयश आले असले तरी त्याने या यादीत दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्यासह 10 फलंदाजांना मागे टाकले. सचिनने 90 व्या कसोटी सामन्यात आपले 28 वे कसोटी शतक ठोकले होते. तर सुनिल गावसकर यांनी 91 व्या कसोटीत 28 वे शतक पूर्ण केले होते.

हेही वाचा: बिनसलंय! सर्वांनी धोनीला शुभेच्छा दिल्या लाडक्या जडेजाने मात्र...

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगावान 28 शतके

 • 48- डॉन ब्रॅडमन

 • 87- स्टीव्ह स्मिथ

 • 90- सचिन तेंडुलकर

 • 91- सुनिल गावसकर

 • 92- मॅथ्यू हेडन

 • 94- युनूस खान

 • 100- रिकी पॉटिंग

 • 105- कुमार संगकारा

 • 108- मायकल क्लार्क

 • 109- हाशिम अमला

 • 110- जॅक्स कॅलिस

 • 114- ब्रायन लारा

या वर्षी स्टीव्ह स्मिथ कसोटीत सर्वात वेगवान 8 हजार धावा पूर्ण करणारा क्रिकेटपटू देखील ठरला होता. यापूर्वी स्मिथने आपले शेवटचे शतक भारताविरूद्ध 2021 मध्ये सिडनी कसोटीत ठोकले होते. त्यानंतर दीर्घ प्रतिक्षेनंतर स्मिथने श्रीलंकेविरूद्ध शतकी खेळी केली.

Web Title: Steve Smith Reached 2nd Spot In Fastest 28 Centuries In Test Cricket List Surpasses Sachin Tendulkar Sunil Gavaskar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top