Ashes 2019 : इसको बोलते कमबॅक; स्मिथचे शानदार शतक

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

ऍशेस मालिकेत सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने दमदार कमबॅक करत शतक ठोकले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक साजरे केले आहे. 

मॅंचेस्टर : ऍशेस मालिकेत सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने दमदार कमबॅक करत शतक ठोकले आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 26वे शतक साजरे केले आहे. 

स्मिथचा खेळपट्टीवर पडून भन्नाट शॉट, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीतही त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत अव्वल क्रमांक गाठला. 

स्मिथने 160 चेंडूंमध्ये आपले शतक साजरे केले. या शतकात त्याने 11 चौकार खेचले. सलामीवीर डेव्डिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस लवकर बाद झाल्यावर त्याने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दुसऱ्या सामन्यात ऑर्चरचा बाउन्सर लागल्याने त्याला दुखापत झाली होती. त्याला तिसऱ्य़ा सामन्याला मुकावेही लागले होते. त्यानंतर चौथ्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने शानदार शतक झळकाविले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith scores 26th test century in Ashes 2019