Ashes 2019 : चेंडू कुरडणारा स्मिथच पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

अॅशेस मालिकेत पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकाविलेल्या स्टिव्ह स्मिथकडे पुन्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद द्यावे अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने केली आहे. 

बर्मिंगहॅम : अॅशेस मालिकेत पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकाविलेल्या स्टिव्ह स्मिथकडे पुन्हा ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद द्यावे अशी मागणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने केली आहे. 

अॅशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथने दोन्ही डावांत शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलिया अडचणीत असताना त्याने केलेल्या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पाँटींगने त्याचे कौतुक करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. 

''स्मिथने टीम पेनला सल्ला देण्याची गरज नाही. स्मिथ तू काही आता कर्णधार नाहीस, अशी एक टीका मी सोशल मीडियावर वाचली. मात्र, या चर्चा फालतू आहेत. स्मिथसारख्या अनुभवी खेळाडूचा सल्ला न घेणे हा पेनचा मूर्खपणा ठरेल. स्मिथने आपली शिक्षा भोगली आहे आणि  त्याचा अनुभवावर संघ खूप अवलंबून आहे. त्याच्या असण्यानं पेनसह संघातील प्रत्येकाला आनंदच होतो. त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झालेलं पाहायला मला नक्कीच आवडेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियालाही असेच वाटत असेल आणि म्हणूनच त्यांनी स्मिथवर आजीवन बंदी घातलेली नाही.'' अशा शब्दांत त्याने आपली भावना व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith should be the captain of Australia team says Ricky Ponting