ट्‌वेंटीतून वगळल्यावर स्टेनकडून कोहलीची माफी

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

भारत दौऱ्यासाठी ट्‌वेंटी-20 संघातून वगळलेल्या डेल स्टेनने विराट कोहली आणि भारतीयांची माफी मागितली आहे. स्टेनने संघातून वगळल्यावर ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केल्यावर त्यासंदर्भात चाहत्यांना उत्तर देताना माफी मागितली.

जोहान्सबर्ग : भारत दौऱ्यासाठी ट्‌वेंटी-20 संघातून वगळलेल्या डेल स्टेनने विराट कोहली आणि भारतीयांची माफी मागितली आहे. स्टेनने संघातून वगळल्यावर ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केल्यावर त्यासंदर्भात चाहत्यांना उत्तर देताना माफी मागितली.

दक्षिण आफ्रिका निवड समितीत मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. त्याकडे लक्ष वेधत स्टेनने बहुदा माझा नंबर हरवला असावा, अशी टिप्पणी वेधत संघनिवडीस लक्ष्य केले. एका चाहत्याने त्यावर तुला महत्त्वाच्या लढतीसाठी राखून ठेवले असेल, अशी खोचक टिप्पणी केली. त्यावेळी स्टेनने कोहली आणि अब्जावधी चाहत्यांची माफी असे ट्विट केले.

स्टेनने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना ट्‌वेंटी-20 खेळण्याचे ठरवले होते. मला आवडणाऱ्या क्रिकेटच्या सर्वात आवडत्या प्रकारातूनच मला दूर करण्यात आले असे स्टेनने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: steyn targests selectors after t20 snub