Asian Games : आशिया स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ पाठवण्यासाठी हस्तक्षेप करा; स्टिमॅक यांचे पंतप्रधानांकडे आर्जव

२३ सप्टेंबरपासून ही प्रतिष्ठेची स्पर्धा चीनमधील हांगझाऊ येथे सुरू होत आहे.
Asian Games stimac
Asian Games stimac sakal
Updated on

नवी दिल्ली : जेमतेम काही दिवसांवर आलेल्या चीनमधील आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाचा सहभाग अनिश्चित झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून भारतीय संघाला खेळण्यास पाठवावे, अशी विनंती भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी केली आहे.

२३ सप्टेंबरपासून ही प्रतिष्ठेची स्पर्धा चीनमधील हांगझाऊ येथे सुरू होत आहे. या स्पर्धेत २३ वर्षांखालील संघ स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्याची तयारी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने केली आहे;

परंतु अव्वल ८ क्रमांकापर्यंत संघाची क्रमवारी असेल तरच भारतीय संघ पाठवता येईल, असा नियम क्रीडा मंत्रालयाचा आहे. भारतीय संघ या नियमात बसत नसल्यामुळे आशिया क्रीडा स्पर्धेतील सहभाग धोक्यात आला आहे.

Asian Games stimac
Ruturaj Gaikwad Asian Games : BCCI ची मोठी घोषणा! धवन नाही तर मराठमोळ्या ऋतुराजच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ

स्टिमॅक यांनी सोशल मीडियावर भलेमोठे पत्र लिहून पंतप्रधान आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. स्टिमॅक आपल्या पत्रात म्हणतात, २०१७ मधील आपला १७ वर्षांखालील संघ जो आत्ता २३ वर्षांखालील गटात खेळत आहे, त्यांनी या २३ वर्षांखालील विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. हा संघ गुणवान आहे, त्यांना आशिया क्रीडा स्पर्धेत खेळण्यापासून रोखू नका.

अशा महत्त्वाच्या स्पर्धेत खेळण्याचा आपल्या संघाचा हक्क आहे. त्यांना प्रोत्साहन द्या. तुम्ही हस्तक्षेप केला तर आपल्या संघाला खेळता येईल, त्यांना चांगला अनुभवही मिळेल, असेही स्टिमॅक यांनी म्हटले आहे.

Asian Games stimac
Asian Games : एशियन गेम्ससाठी 'या' 4 खेळाडूंचे स्थान निश्चित! लवकरच होणार मोठी घोषणा

आशिया फुटबॉल कॉन्फडरेशनमध्ये भारतीय २३ वर्षांखालील संघ १८ व्या क्रमांकावर आहे. आपले स्वतःचेच मंत्रालय एका नियमाचा आधार घेत आपल्या संघाचा सहभाग रोखत आहे. वास्तविक या स्पर्धेत खेळणाऱ्या इतर काही संघांपेक्षा आपला संघ वरचढ आहे,

असे स्टिमॅक यांनी अनुराग ठाकूर यांना उद्देशून म्हटले आहे. खरं तर हा खेळ असा आहे जेथे कमी रँकिंग असलेला संघ अशा बहुराष्ट्रीय स्पर्धांत मोठ्या संघाना हरवत असतो असा इतिहास आहे, असाही दाखला स्टिमॅक यांनी दिला.

Asian Games stimac
Asia Cup 2023: केएल राहुल आशिया कपमधुन बाहेर? दिग्गज खेळाडू करू शकतो पुनरागमन

भविष्यातील फुटबॉल खेळाडू तयार करण्यासाठी भारताने २०१७ पासून गुंतवणूक सुरू केली, त्या वर्षी १७ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा भारतात आयोजित केली होती. यजमान असल्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत खेळला होता. जगातील सर्वोत्तम खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव त्यांना मिळाला होता, त्या संघातील खेळाडू आता २३ वर्षांखालील संघात खेळत आहेत.

एम्बापेचा गौरव भारतीयांना भावला

पंतप्रधान हे फुटबॉलचेही चाहते आहेत. फ्रान्स दौऱ्यात त्यांनी किलियन एम्बापेचा गौरव केला, भारतात तुझे असंख्य चाहते आहेत, असे त्याला सांगितले. एम्बापेबद्दल तुम्ही काढलेले गौरद्गार आपल्या देशातील फुटबॉल प्रेमींना भावले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा विनंती करून भारतीय फुटबॉल संघाला आशिया क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी हस्तक्षेप करावा, असे आर्जव स्टिमॅक यांनी पंतप्रधानांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.