
Australia VS Sri Lanka World Cup 2023 Match Ekana Stadium Video : वर्ल्ड कपच्या 14व्या सामन्यात पाच वेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ सोमवारी लखनौच्या एकना स्टेडियमवर आमनेसामने आले. सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाल्याने स्टेडियममध्ये गोंधळ उडाला.
झालं असं की, वादळामुळे स्टेडियमच्या छतावर लावण्यात आलेल्या लोखंडी होर्डिंग वरून पडू लागल्या. होर्डिंग्ज पडल्याने प्रेक्षक गॅलरीत गोंधळ उडाला. चाहते त्यांच्या जागेवरून उठले आणि पळू लागले. सुरक्षा कर्मचार्यांनी सर्वांना समजावून सांगितले आणि दुसरीकडे बसण्यास सांगितले. मात्र या काळात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि सामन्यादरम्यान मोठा अपघात होता होता टाळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव 43.3 षटकांत 209 धावांत गुंडाळला. लंकन संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी पहिल्या विकेटसाठी 125 धावांची भागीदारी करून श्रीलंकेला दमदार सुरुवात करून दिली. निसांका 61 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कुसल मेंडिस 78 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे दोघे बाद झाल्यानंतर लंकेचा संघ 209 धावांवर गडगडला.
निसांका आणि मेंडिस व्यतिरिक्त फक्त चरित अस्लंकाला दुहेरी आकडा गाठता आला. त्याने 25 धावा केल्या. दासून शनाका बाद झाल्यानंतर कर्णधार असलेल्या कुसल मेंडिसला केवळ नऊ धावा करता आल्या. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारी सदीरा समरविक्रमा आठ धावांवर बाद झाला.
धनंजय डी सिल्वा सात आणि लाहिरू कुमारा चार आणि चमिका करुणारत्ने आणि दुनिथ वेललागे यांना प्रत्येकी दोनच धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.