naveen ul haq
sakal
काबुल - भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने १५ खेळाडूंच्या संघात वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि अष्टपैलू गुलबदिन नबी यांचे पुनरागमन केले आहे.
जगप्रसिद्ध लेगस्पिनर राशिद खान याच्याकडे नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आली असून इब्राहिम झद्रान याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.