IND vs NZ : अजिंक्यच्या दुखापतीवर नेटकऱ्यांनी घेतले तोंडसुख

अजिंक्यला वगळताना संघ व्यवस्थापनाने दिलेल्या कारणावर सोशल कमेंटचा पाऊस
ajinkya rahane, ishant sharma, ravindra jadeja
ajinkya rahane, ishant sharma, ravindra jadejaesakal

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी (IND vs NZ 2nd test ) सामन्यात विश्रांतीवर गेलेल्या विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. मात्र दुसऱ्या कसोटीतून तीन खेळाडूंना डच्चू मिळाला. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही ( ajinkya rahane) या यादीत समावेश आहे. गेल्या अनेक सामन्यात अजिंक्य रहाणेला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याचे संघातील स्थान डळमळीत होते. (Ind vs NZ 2nd Test Updates)

मात्र, बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा ( ishant sharma ) आणि रविंद्र जडेजा ( ravindra jadeja ) हे दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत असे ट्विट केले. ओल्या मैदानामुळे दुसरी कसोटी सुरु होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नाणेफेकही उशाराने होणार आहे. परंतु बीसीसीआयने नाणेफेकीनंतर होणाऱ्या संघाच्या घोषणेची वाट न पाहता ट्विट करुन अजिंक्य राहणे, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा हे दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले.

बीसीसीआयच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांना बीसीसीआयने अजिंक्य रहाणेला संघातून वगळताना दिलेले दुखापतीचे कारण रुचले नाही. त्यांनी बीसीसीआयच्या या ट्विटवर कमेंटचा पाऊस पाडला. (Player injuries in 2nd test)

दरम्यान, नेटकऱ्यांनी अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांना वगळण्याबाबत आक्षेप घेतला नाही. मात्र रविंद्र जडेजाला वगळण्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप नोंदवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com