Sumit Nagal : क्ले कोर्टवर रचला इतिहास! आजपर्यंत कोणत्याही भारतीय टेनसपटूला जमलं नाही ते सुमितनं करून दाखवलं

Sumit Nagal  became the first Indian player to win a singles main draw match ATP Masters
Sumit Nagal became the first Indian player to win a singles main draw match ATP Masters esakal

Sumit Nagal became the first Indian player to win a singles main draw match ATP Masters : सुमित नागलने आज इतिहास रचला. तो क्ले कोर्टवरील एटीपी मास्टर्सच्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीत विजय मिळवणारा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला. सुमिन नागलने माँटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमधील पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानावर असलेल्या माटिओ अर्नाल्डीचा पराभव केला.

नागलने एटीपी मास्टर्स 1000 च्या या स्पर्धेत पात्रता फेरी पार करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळवला होता. 42 वर्षानंतर पुरूष एकेरीमध्ये भारताचा टेनिसपटू मुख्य ड्रॉमध्ये पोहचला होता. त्याने पहिल्या फेरीत इटलीच्या माटिओचा 5-7, 6-2, 6-4 असा पराभव केला. आता त्याचा दुसऱ्या फेरीतील सामना हा जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या होलगेर रुनेसोबत असणार आहे.

Sumit Nagal  became the first Indian player to win a singles main draw match ATP Masters
Rohit Sharma: रोहित करतोय सचिन, द्रविड अन् भज्जीची भन्नाट नक्कल, Video तुफान व्हायरल

गेल्या 42 वर्षात एटीपी मास्टर्स स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये एकाही भारतीय टेनिसपटूला मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळाली नव्हती. यापूवी 1982 मध्ये रमेश क्रिष्णन यांनी अशी कामगिरी केली होती. मात्र त्यांचा मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीतच पराभव झाला होता.

सुमित नागलने जागतिक क्रमवारीत 55 व्या स्थानावर असणाऱ्या अर्जेंटिनाच्या एकोस्टाला पराभूत करण्यापूर्वी पहिल्या पात्रता फेरीत फ्लाव्हिओ कोबीलीचा 6-2, 6-3 असा पराभव केला होता. आता त्याने मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत विजय मिळवत इतिहास रचला आहे.

Sumit Nagal  became the first Indian player to win a singles main draw match ATP Masters
CSK vs KKR Live Score Update : जडेजाने पाडलं भगदाड; केकेआरचा डाव गडगडला

मध्यंतरी सुमित नागलने आपल्याला एकेरीमध्ये व्यावसायिक टेनिस स्पर्धेत खर्चाचा मेळ बसवणं अवघड जात असल्याचं ट्विट केलं होतं. त्याने परदेशात प्रशिक्षक घेण्याचा खर्च आणि स्पर्धांमधून मिळणाऱ्या पैशाचे गणित बसत नसल्याने भारत सरकारकडे मदतीचा हात मागिला होता.

सुमितने त्याला देखील केंद्र सरकारच्या टॉप स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली होती. या स्कीममधील खेळाडूंच्या परदेशातील प्रशिक्षणाचा खर्च हा केंद्र सरकार उचलत असते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com