
नवी दिल्ली : भारतीय फुटबॉलमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता अत्यंत चिंताजनक आहे आणि महत्त्वाची इंडियन सुपर लीग (आयएसएल) अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यामुळे भारतीय फुटबॉलची संपूर्ण रचना कोलमडली आहे, अशी खंत माजी कर्णधार आणि आघाडीचा खेळाडू सुनील छेत्रीने व्यक्त केली.