Sunil Chhetri: भारतीय संघात सुनील छेत्रीचा समावेश नाही; नेशन्स करंडक फुटबॉल, वगळले की विश्रांती, कारण अस्पष्ट
Indian Football: भारतीय फुटबॉल संघातील दिग्गज खेळाडू सुनील छेत्रीचा नेशन्स करंडक स्पर्धेसाठी निवडीत समावेश झाला नाही. त्याच्या गैरहजेरीमागचे कारण अद्याप स्पष्ट नाही.
नवी दिल्ली : नव्याने नियुक्त झालेल्या भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या सीएएफए नेशन्स करंडक स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या ३५ संभाव्य खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्रीचा समावेश केला नाही.