
बंगळूर : आशियाई करंडक पात्रता फेरीच्या राष्ट्रीय शिबिरामधून सुनील छेत्रीला वगळण्यात आल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले, की सराव शिबिरासाठी सुनील छेत्रीची निवड करण्यात आलेली नाही; मात्र सिंगापूरविरुद्धच्या लढतीसाठी त्याचा संघात प्रवेश होऊ शकतो. त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले आहेत.