
Former India captain Sunil Chhetri Withdraw his Retirement: माजी फुटबॉलपटू सुनिल छेत्रीने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. ४० वर्षीय माजी कर्णधार भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. १९ मार्च रोजी मालवदीवमध्ये होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात छेत्री भारतीय संघाचा भाग असणार आहे.
हा सामना AFC Asia Cup 2027 च्या पात्रता फेरीचा सराव सामना म्हणून खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २५ मार्च रोजी बांगलादेशमध्ये पात्रता फेरीचा पहिला सामना खेळणार आहे.