अविश्वसनीय! सौम्य शब्द वापरतोय नाही तर... सुनिल गावसकर टीम इंडियावर जाम भडकले | Kuldeep Yadav Sunil Gavaskar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kuldeep Yadav Dropped Sunil Gavaskar Criticize

Kuldeep Yadav : अविश्वसनीय! सौम्य शब्द वापरतोय नाही तर... सुनिल गावसकर टीम इंडियावर जाम भडकले

Kuldeep Yadav Dropped Sunil Gavaskar Criticize : भारतीय संघव्यवस्थापनाने बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला वगळले. कुलदीप यादवने पहिल्या कसोटी सामन्यात सामनीवीराचा पुरस्कार मिळवला होता. टीम इंडियाच्या या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली. सोनी टीव्हीवरील समालोचनावेळी गावसकर जाम भडकले असल्याचे दिसले.

हेही वाचा: Ind vs Ban live 2nd Test: जयदेव उनाडकट अन् अश्विनचा बांगलादेशमध्ये कहर! पाचवा धक्का...

भारताचा कर्णधार केएल राहुल नाणेफेकीसाठी आला त्यावेळी त्याने भारतीय संघाची घोषणा केली. पहिल्या कसोटीत खेळलेल्या भारतीय संघात एक बदल होता. गेल्या कसोटीतील सामनावीर कुलदीप यादवच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली होती.

यावेळी केएल राहुलने सांगितले की कुलदीपला वगळण्याचा निर्णय खूप कठीण होता. मला विश्वास आहे की रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करतील. मात्र राहुलच्या या मतावर सुनिल गावसकर नाराज दिसे. त्यांना गेल्या सामन्यातील सामनावीराला बेंचवर बसवण्याचा निर्णय रूचला नाही.

हेही वाचा: Byju's Quit : स्पॉन्सर सोडतायत BCCI ची साथ; Oppo झालं आता Byju's अन् MPL चा देखील काढता पाय?

सुनिल गावसकर म्हणाले, 'गेल्या सामन्यातील सामनावीराला वगळण्याचा निर्णय अविश्वसनीय आहे. मी हा खूप सैम्य शब्दप्रयोग करत आहे. मला अजून कडक शब्दात टीका करायला आवडली असती. तुम्ही सामनावीरालाच वगळता हा अविश्वसनीय निर्णय आहे. याने 20 पैकी 8 विकेट्स घेतल्या आहेत.'

सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सुनिल गावसकर पुढे म्हणाले की, 'तुम्हाला आजच्या सामन्यात फक्त दोन फिरकीपटूच खेळवावे लागणार होते. त्यामुळे तुम्हाला तिसऱ्या स्पिनरला वगळणे गरजेचेच होते. मात्र ज्याने तुम्हाला 8 विकेट्स काढून दिल्या त्याला तुम्ही खेळवायलाच हवे होते.'

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...