esakal | गावसकरांनी निवडला T20 WC चा संघ; धवन, श्रेयसला डावलले
sakal

बोलून बातमी शोधा

सुनील गावसकर

गावसकरांनी निवडला T20 WC चा संघ; धवन, श्रेयसला डावलले

sakal_logo
By
नामदेव कुंभार

India T20 World Cup squad : टी-20 विश्वचषक 17 ते आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएई आणि ओमनच्या मैदानात रंगणार आहे. विश्वचषकासाठी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती बुधवारी मुंबईच्या बीसीसीआयचीच्या (BCCI) मुख्य कार्यलयात बैठक घेणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत भारताच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक सुनील गावसकर यांनी संभाव्य भारतीय संघाची निवड केली आहे.

सुनील गावसकरांनी निवडलेला 15 खेळाडूंचा संघ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. कारण गावसकरांनी आपल्या संघात श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना संधी दिली नाही. तर राहुल याला मधल्या फळीत खेळवण्यात आलं आहे. गावसकरांनी रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून राहुलऐवजी विराट कोहलीचं नाव पुढे केलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहरची निवड केली आहे. तसेच गावसकर यांनी शार्दूल ठाकुरलाही संभाव्य संघामध्ये स्थान दिलेय. चार अष्टपैलू आणि दोन यष्टीकरक्षकांची निवड केली आहे.

सुनील गावसकरांनी निवडलेला संघ -

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, क्रुणाल पंड्या, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, युजवेंद्र चहल

loading image
go to top