रिषभ पंत टीम इंडियाचा कॅप्टन होईल : सुनील गावसकर

पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामन्यात विजय नोंदवल्याचे पाहायला मिळआले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले होते.
rishabh pant and sunil gavaskar
rishabh pant and sunil gavaskar e sakal

लिटल मास्टर सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी टीम इंडियाचा युवा विकेट किपर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) आगामी वाटचालीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केलीय. भविष्यात रिषभ पंत टीम इंडियाचा कॅप्टन झाल्याचे दिसेल, असे गावसरांनी म्हटले आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामात (IPL 2021) श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत पंतच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच नेतृत्व करताना पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने 8 पैकी 6 सामन्यात विजय नोंदवल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) संघाने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले होते.

पंतने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना सुनील गावसकर यांनी चांगलेच प्रभावित केले आहे. गावसकरांनी पंतच्या छोट्या चुका पदरात घालून त्याचे भविष्य उज्वल असल्याचे भाष्य केले आहे. पंतमध्ये शिकण्याची भूख दिसते. त्याने धैर्य बाळगले तर तो भविष्यात टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल, असे गावसकरांनी म्हटले आहे.

rishabh pant and sunil gavaskar
ICC Ranking - कसोटीत विराटसेनेचाच जलवा

गावसकर यांनी 'स्पोर्ट्स स्टार्स'ला लिहिलेल्या कॉलममधून पंतवर कौतुकाचा वर्षाव केलाय. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी केली. त्याच्याकडून काही चुका झाल्या पण त्या इतर कर्णधाराकडूनही होतात, असे म्हणत गावसकरांनी पंतचे नेतृत्व आशादायी असल्याचे म्हटले आहे.

'पंत भविष्यात टीम इंडियाचे नेतृत्व करेल'

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी आपल्या कॉलममध्ये पुढे लिहिलंय की, पंत भविष्यात भारतीय टीमचे नेतृत्व करताना दिसेल. याबद्दल मनात कोणतीही शंका नाही. संधी मिळाल्यानंतर क्षमता दाखवण्याची प्रतिभा त्याने दाखवून दिली आहे. सुधारणा करुन तो संधीच सोनं करतो, असे गावसकरांनी म्हटले आहे.

rishabh pant and sunil gavaskar
IPL साठी पाकिस्तानी खेळाडूने खेळला मोठा डाव?

पंतने आयपीएलच्या 14 व्या हंगामात आपल्या नेतृत्वाने प्रभावित केलेच. याशिवाय त्याने फलंदाजीतही कमाल दाखवली. 8 सामन्यात त्याने 35 पेक्षा अधिक सरासरीने 213 धावा केल्या. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कमालीची कामगिरी करुन दाखवली होती. त्याच्या कामगिरीच्या जोरावरच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर धूळ चारल्याचे पाहायला मिळाले होते. या दौऱ्यापासून पंतची परिपक्वता दिवसागणिक अधिक प्रगल्भ होत असल्याचे दिसत आहे.

sunil gavaskar says rishabh pant is india captain for future

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com