Sunil Gavaskar WI vs IND : केंद्रीय करार पद्धत बंद करा... सुनिल गावसकरांची खळबळजनक मागणी

Sunil Gavaskar Central Contract WI vs IND
Sunil Gavaskar Central Contract WI vs INDesakal

Sunil Gavaskar Central Contract WI vs IND : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने यजामन विंडीजचा तीन दिवसात खुर्दा उडवला. विंडीजसाठी या महिन्यात दोन मोठे धक्के बसले आहेत. पहिल्यांदा ते भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी पात्र होऊ शकले नाहीत. त्यानंतर भारतीय संघाने त्यांना अवघ्या तीन दिवसात अस्मान दाखवले.

वेस्ट इंडीज क्रिकेट हे जेव्हापासून फ्रेंचायजी क्रिकेट सुरू झालं आहे तेव्हापासून रसातळाला जात आहे. वेस्ट इंडीजचे दर्जेदार क्रिकेटपटू हे फ्रेंचायजी क्रिकेटलाच प्राधान्य देत आहेत.

यावर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर (Sunil Gavaskar News) यांनी आपल्या जुन्या विंडीज दिवसांना उजाळा देत असताना आता ढासळलेल्या विंडीज क्रिकेटला सुधारण्यासाठी काही सल्ले देखील दिले. (West Indies Cricket News)

Sunil Gavaskar Central Contract WI vs IND
ODI WC 2023: आगरकर निघाला विंडीजला! वर्ल्ड कपसोबतच रोहित-विराटच्या भविष्यावर होणार मोठा निर्णय

द इंडियन एक्सप्रेसच्या आयडिया एक्सचेंज कार्यक्रमात बलताना गावसकर म्हणाले की, 'मी माझा पहिला दौरा वेस्ट इंडीजचा केला होता. मला माहिती आहे की तिथे काही जबरदस्त क्रिकेटपटूंनी एका समृद्ध वारसा मागे ठेवला आहे. विंडीजमधील मानसिकता ही कशाचीच काळजी नसलेली आहे. अशी मानसिकता असणे चांगलं आहे.

'मात्र खेळताना ही मानसिकता तुम्हाला हवा तसा निकाल देऊ शकत नाही. लॉईड, माल्कम मार्शल्स, व्हिव रिचर्ड्स, अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, गार्नेर्स हा वेस्ट इंडीजचा सुवर्णकाळ होता. प्रत्येक कसोटी सामना खेळला तो अतिरिक्त उत्पन्न होते.'

सुनिल गावसकर यांना असं वाटतं की खेळाडूंचा पगार हा त्यांच्या कामगिरीवर ठरला पाहिजे. त्यांनी केंद्रीय करार रद्द करण्याचा देखील सल्ला दिला. (Cricket Player Central Contract)

Sunil Gavaskar Central Contract WI vs IND
Asian Games 2023 : दोनवेळची चॅम्पियन टीम इंडिया सहभागी होऊ शकत नाही... प्रशिक्षक झाले भावूक

गावसकर म्हणाले की, 'आज वेस्ट इंडीजचे खेळाडू मग ते कसोटी किंवा टी 20 खेळाडू असोत, जगभारतील खेळाडू असोत त्यांना केंद्रीय करारानुसार निश्चित रक्कम मिळते. शेकडो, हजारो डॉलर्स त्यांना मिळलात.

'मात्र वेस्ट इंडीजमधील मानसिकता पाहिली तर जर एवढी रक्कम एक धाव करण्यापूर्वीच तुमच्या बँक खात्यात आले तर खेळाडू धावा करणे गांभीऱ्याने घेणारही नाही.'

गावसकर पुढे म्हणाले की, 'माझा सल्ला आहे की कसोटी सामन्याची मॅच फी वाढवास मात्र त्यांना केंद्रीय कराराद्वारे आधीच पैसे देऊ नका. तुम्हाला जर तुमच्या कामगिरीवर पैसे मिळाले तर कदाचित खेळाडू वेगळ्या मानसिकतेने खेळतील.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com