Sunil Gavaskar shares his thoughts on Rohit Sharma and Virat Kohli
Sunil Gavaskar shares his thoughts on Rohit Sharma and Virat Kohlisakal

IND vs NZ: भविष्य अंधारातच! कोहली-रोहित बाबत गावसकरांचे मोठे वक्तव्य

भविष्य अंधारातच! कोहली-रोहित बाबत गावसकरांचे मोठे वक्तव्य

IND vs NZ: नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील सततच्या अनुपस्थितीमुळे चाहते आणि तज्ञांना त्यांच्या फॉरमॅटमधील भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास भाग पाडले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून न्यूझीलंडविरुद्ध आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी दोघांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता.

या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी या दोघांनाही भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टी-20 क्रिकेटमधील या दोन फलंदाजांच्या भविष्यावर वक्तव्य केले आहे. (Sunil Gavaskar shares his thoughts on Rohit Sharma and Virat Kohli's T20I future)

Sunil Gavaskar shares his thoughts on Rohit Sharma and Virat Kohli
Babar Azam: Sexting च्या आरोपानंतर बाबरचे ट्विट व्हायरल; म्हणाला...

नुकतेच एका माध्यम वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, पुढचा टी-20 विश्वचषक पुढच्या वर्षी 2024 मध्ये आहे. नवीन निवड समिती युवा खेळाडूंना अधिक संधी देऊ इच्छिते. याचा अर्थ कोहली आणि रोहितचा यापुढे विचार केला जाणार नाही. 2023 मध्ये त्याचा फॉर्म प्रभावी राहिला तर तो संघात असण्यास पात्र आहे. दुसरे कारण मला ऑस्ट्रेलिया मालिका हे वाटते. निवडकर्त्यांना कदाचित या दोघांनाही मोठ्या स्पर्धेसाठी विश्रांती द्यायची होती जेणेकरून ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध नव्याने सुरुवात करू शकतील आणि त्याचा भारताला फायदा होईल.

Sunil Gavaskar shares his thoughts on Rohit Sharma and Virat Kohli
Babar Azam Leaked Video: 'बाबरने मला प्रेग्नेंट केले अन्...' महिलेने पाकिस्तानच्या कर्णधारावर केला गंभीर आरोप

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र होण्यासाठी भारताला ही मालिका जिंकावी लागेल. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या WTC गुणतालिकेत अव्वल आहे. त्याचबरोबर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो.

Sunil Gavaskar shares his thoughts on Rohit Sharma and Virat Kohli
Team India Video : श्रीलंकेवर दमदार विजयांनंतर टीम इंडियाचा मराठी गाण्यावर डान्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com