
SRH Player Retention : ऑरेंज आर्मीचा जम्मूच्या पोरांवर विश्वास
SRH Player Retention Before IPL 2022 Mega Auction : आयपीएलच्या मेगा हंगामापूर्वी सनरायझर्स हैदराबादने (SRH) न्यूझीलंडच्या केन विल्यमसनवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्याच्यासह दोन भारतीय अनकॅप्ड प्लेयर्संना हैदराबाद फ्रेंचायझी संघाने रिटेन केले आहे. गेल्या दोन हंगामापासून जम्मू काश्मीरचा स्टार अष्टपैलू सनरायझर्सच्या संघातून खेळताना पाहायला मिळाले आहे. तो पुन्हा याच संघातून खेळेल. अब्दुल समदने 23 सामन्यात 222 धावा केल्या आहेत.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये जन्मलेल्या 22 वर्षीय उमरान मलिकवरही हैदराबादने भरवसा दाखवलाय. गत हंगामात उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. आयपीएलच्या 14 व्या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा तो भारतीय गोलंदाज होता. हैदराबादने केन विल्यमसनला 14 कोटी तर अष्टपैलू अब्दुल समद आणि उमरान मलिक या दोघांना प्रत्येकी 4-4 कोटीमध्ये रिटेन करण्याचा निर्णय हैदराबाद संघाने घेतला आहे. हैदराबादेन मेगा लिलावापूर्वी 22 कोटी खर्च करुन आपल्या पर्समध्ये मोठी रक्कम शिल्लक ठेवली आहे.
आयपीएलच्या मागील हंगामात डेव्हिड वॉर्नरची खराब कामगिरी चांगलीच चर्चेत राहिली. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या वॉर्नरने आधीर कर्णधारपद गमावले आणि नंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तो ज्यावेळी वॉटर बॉय म्हणून मैदानात गेल्याचे पाहायला मिळाले त्यावेळी पुन्हा तो भगव्या जर्सीत दिसणार नाही अशी चर्चा रंगली होती. पण टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरीनंत त्याचा नावाचा हैदराबाद पुन्हा विचार करणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या वॉर्नरला हैदराबादने कॉर्नर दाखवला आहे. त्याच्याशिवाय राशिदलाही संघाने रिलीज केले आहे.
Web Title: Sunrisers Hyderabad Retain Jammu Kashmirs Uncapped Pair Of Abdul Samad And Umran Malik With Kane Williamson
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..