Naseem Shah : आधी उर्वशी आता 'नागिन' फेम अभिनेत्री पाकच्या नसीम शाहवर झाली फिदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Surbhi Jyoti Naagin Serial Fame Actress Tweet On Naseem Shah

Naseem Shah : आधी उर्वशी आता 'नागिन' फेम अभिनेत्री पाकच्या नसीम शाहवर झाली फिदा

Surbhi Jyoti Tweet On Naseem Shah : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहची टी 20 कारकिर्द आता कुठे सुरू झाली आहे. त्याने आशिया कपच्या ग्रुप स्टेजमधील भारताविरूद्धच्या सामन्यात टी 20 पदार्पण केले. आता पर्यंत त्याने 4 टी 20 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. मात्र तो अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर चांगलाच प्रकाश झोतात आला. त्याने अफगाणिस्तानविरूद्ध शेवटच्या षटकात सलग दोन षटकार मारत पाकिस्तानला निसटता विजय मिळवून दिला. दरम्यान, चार सामन्यातच हिरो झालेला नसीम खानवर भारतातील काही अभिनेत्री देखील फिदा झाल्या आहेत. नुकतेच मॉडेल उर्वशी रौतेलाने एक व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली होती. आता नानिग मालिकेतील अभिनेत्री सुरभी ज्योतीने देखील नसीम शाहबद्दल ट्विट करत स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधले.

हेही वाचा: KL Rahul : मग आता काय मी टीमच्या बाहेर बसू? केएल राहुल भडकला

अभिनेत्री सुरभी नसीम शाहबद्दल ट्विट करताना म्हणते की, 'नक्कीच पाकिस्तानला एक हिरा मिळाला आहे.' सुरभीचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. सुरभी ज्योती ही प्रसिद्ध मालिका अभिनेत्री आहे. तिने 'नागिन' या प्रसिद्ध मालिकेत काम केले आहे. यापूर्वी तिने 'कुबूल हैं' या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली होती. सुरभीला 'कुबूल हैं' या मालिकेसाठी इंडियन टेली अवॉर्ड देखील मिळाला होता. सुरभी ज्योतीने 2021 मध्ये 'क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा हैं' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये देखील पदार्पण केले.

हेही वाचा: Ravindra Jadeja : जडेजाला 'स्की-बोर्ड'ची मस्ती नडली; हे झालंच कसं? BCCI संतापले

दरम्यान, नसीम शाहने पाकिस्तानला विजयासाठी सहा चेंडूत 12 धावांची गरज असताना पहिल्या दोन चेंडूवर सलग दोन षटकार मारत सामना जिंकून दिला होता. पाकिस्तानने अफगाणिस्तान विरूद्धचा हा सामना फक्त 1 विकेटने जिंकला. यामुळे भारताची आशिया कपची फायनल खेळण्याची उरली सुरली आशा संपुष्टात आली. आता आशिया कपची फायनल 11 सप्टेंबरला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

Web Title: Surbhi Jyoti Naagin Serial Fame Actress Tweet On Naseem Shah After Pakistan Afghanistan Asia Cup 2022 Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CricketactressAsia Cup