esakal | सुरेश रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावरुन वाद; सोशल मीडियावर संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना वादात अडकताना दिसत आहे. रैनाने तमिळनाडू प्रीमियर लीगमधील सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे

रैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावरुन वाद; सोशल मीडियावर संताप

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना वादात अडकताना दिसत आहे. रैनाने तमिळनाडू प्रीमियर लीगमधील सामन्यांमध्ये कॉमेंट्री करताना एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. रैना म्हणाला होता की, 'मी एक ब्राह्मण आहे, त्यामुळे मला चेन्नईची संस्कृती आपलीसी करण्यास जास्त अडचणी आल्या नाहीत.' रैनाचे हे वक्तव्य अनेकांना आवडलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना पेव फुटले आहे. रैना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो.

तमिळनाडू प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यामध्ये सुरेश रैना कॉमेंट्री टीममध्ये सहभागी झाला होता. सामन्याच्या दरम्यान सहकारी कॉमेंटेटरने सुरेश रैनाला दक्षिण भारताच्या संस्कृतीशी कशाप्रकारे जुळवून घेत आहेस असा प्रश्न विचारला. यावर रैना म्हणाला की, मी एक ब्राह्मण आहे. मी चेन्नईमध्ये 2004 मध्ये खेळलो आहे. मला याठिकाणची संस्कती, खेळाडू यांच्यावर प्रेम आहे. मी अनिरुद्ध श्रीकांत, बद्रीनाथ, बाला भाई (लक्ष्मीपती बालाजी) यांच्यासोबत खेळलो आहे.

आमच्या सीएसकेच्या टीममध्ये चांगले प्रशासन आहे आणि आमचे कौशल्य दाखवण्यासाठी पूर्ण वाव आहे. मला येथील संस्कृती खूप आवडते आणि मी सीएसकेचा भाग असल्याने स्वत:ला भाग्यवान मानतो, असं रैना म्हणाला. स्वत:ला ब्राह्मण म्हणून सांगितल्याने रैनावर टीका होत आहे. अनेकांनी रैनाकडे माफी मागण्याची मागणी केली आहे.

सुरेश रैनाने आपल्या आयपीएल करियरची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जसोबत केली होती आणि तो अद्याप या टीमचा एक भाग आहे. रैनाने धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेकडून खेळताना अनेकदा चांगली खेळी करुन दाखवली आहे. रैनाने मागील वर्षी 15 ऑगस्टला धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर काही मिनिटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं होतं. तो इंडियन प्रीमियर लीगचा 14 व्या सीझनच्या 31 सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.

loading image