
म्युनिक : भारताची १९ वर्षीय हरहुन्नरी नेमबाज सुरुची सिंग हिने मोठा पराक्रम केला. सलग तिसऱ्या विश्वकरंडक नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. भारताची गोल्डन गर्ल म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सुरुचीने येथे सुरू असलेल्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये आपला सुवर्ण ठसा उमटवला.