ICC T20I Rankings : सुर्यकुमार यादव-व्यंकटेश अय्यरची मोठी झेप

Venkatesh Iyer And Suryakumar Yadav
Venkatesh Iyer And Suryakumar YadavSakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) ने बुधवारी टी-20 क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली. यात वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेत 'मॅन ऑफ द सीरीज' पटकवणाऱ्या सुर्यकुमार यादवसह व्यंकटेश अय्यरनं मोठी झेप घेतली आहे. या दोन्ही खेळाडूंनी घरच्या मैदानावर झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत लक्षवेधी कामगिरी केली होती.

सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 107 धावासह टी 20 मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. दुसरीकडे व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) 92 धा केल्या होत्या. या कामगिरीचा दोघांनीही चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत 35 स्थानांच्या सुधारणेसह सुर्यकुमार यादव आता 21 व्या स्थानावर पोहचला आहे. व्यंकटेश अय्यरने 203 स्थानावरुन 115 व्या क्रमांकावर पोहचला आहे. केएल राहुल आणि विराट कोहली हे अनुक्रमे सहाव्या आणि 10 व्या क्रमांकावर आहेत.

Venkatesh Iyer And Suryakumar Yadav
रोहित 'राज'मध्ये संजू सॅमसनचे उखळ होणार पांढरे?

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेनंतर रँकिंगमध्ये बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा एश्टन अँगर याने अव्वल दहा गोलंदाजामध्ये स्थान मिळवले आहे. तो नवव्या स्थानावर पोहचलाय. न्युझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीनंतर कसोटी क्रमावारीत कायले जेमीसन आणि टिम साउदी अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. दोघांनी प्रत्येकी एक-एक स्थानांनी सुधारणा नोंदवली आहे.

Venkatesh Iyer And Suryakumar Yadav
VIDEO: नेपाळच्या 'या' विकेटकिपरचं क्रिकेट जगत का करतयं कौतुक?

वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी सुर्यकुमार यादवला दुखापत झाली आहे. तो आगामी मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे रँकिंगमध्ये सुधारणा करण्याची त्याची पुढची संधी आणखी लांबणीवर पडेल. दुसरीकडे व्यंकटेश अय्यरला कामगिरीतील सातत्य कायम राखून टीम इंडियातील स्थान भक्कम करण्यासोबतच रँकिंगमध्ये आणखी झेप घेण्याची संधी असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com