ICC Ranking : सूर्यकुमार यादवचे चांदी; T20 क्रमवारीत कारकिर्दीच्या सर्वोत्तम स्थानी

ICC T20 Ranking मध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला टाकले मागे
suryakumar yadav
suryakumar yadavesakal
Updated on

Suryakumar Yadav ICC Ranking : सूर्यकुमार यादवने आता आयसीसी टी-20 क्रमवारीतही वादळ निर्माण केले आहे. भारताचा हा मधल्या फळीतील फलंदाज आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्या आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील शेवटच्या सामन्यात 36 चेंडूत मॅच-विनिंग 69 धावा केल्यानंतर सूर्यकुमारचे 801 रेटिंग पॉईंट्स आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला दोन रेटिंग गुणांनी मागे टाकले आहे. मात्र पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान अजूनही टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये आपल्या बॅटने सर्वाधिक धावा केल्या. सूर्यकुमारने यावर्षी 20 सामन्यांमध्ये 37.88 च्या सरासरीने आणि 82.84 च्या स्ट्राइक रेटने 682 धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने 2022 मध्ये 11 सामन्यात 556 धावा केल्या आहेत. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. रिझवानची यंदाची सरासरी 61.77 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thailand Open
Sports News
Vinesh Phogat
Shreyas Iyer
Marathi News Esakal
www.esakal.com