Virat Kohli VIDEO : सूर्यानं घेतली मुलाखत; विराट म्हणतो आम्ही इतक्या वर्षापासून आहे मात्र तू आलास अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav Interview Virat Kohli

Virat Kohli VIDEO : सूर्यानं घेतली मुलाखत; विराट म्हणतो आम्ही इतक्या वर्षापासून आहे मात्र तू आलास अन्...

Suryakumar Yadav Interview Virat Kohli : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना भारताने 67 धावांनी जिंकला. भारताने लंकेसमोर 374 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र कर्णधार दसुन शानकाच्या झुंजार 108 धावांच्या शतकी खेळीनंतरही श्रीलंकेला 306 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून माजी कर्णधार विराट कोहलीने 83 चेंडूत 113 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आले.

हेही वाचा: Prithvi Shaw: 49 चौकार अन् 6 षटकार! पृथ्वी शॉने जागेवरूनच ठोकल्या 232 धावा

विराट कोहलीने बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती. ती त्याने 2022 वर्षाची सांगता शतकाने केली. त्यानंतर तो श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत ब्रेकवर गेला होता. ब्रेकवरून परत येताच पहिल्या वनडे सामन्यात विराटने शतकी खेळी केली. त्याने वर्षाची सुरूवात शतकाने केली. सामना झाल्यानंतर भारताचा 360 डिग्री सूर्यकुमार यादवने विराट कोहलीची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत विराट कोहली सूर्याची स्तुती करताना म्हणाला की, 'आम्ही तर अनेक वर्षापासून इथं आहे. मात्र तू गेल्या वर्षभरात जे काही केलंस ते खूप विशेष आहे. मी यापूर्वी असं काही पाहिलं नव्हतं. तू एक एक वेगळीच शैली घेऊन खेळतोस. तुझ्यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळीच उर्जा संचारत असते. ते तुझ्यावर खरं प्रेम करतात कारण तू अशा प्रकारे फलंदाजी करत आहेस की त्याची अनुभूती आम्ही देखील घेत आहोत.'

हेही वाचा: Gautam Gambhir : अखेर गंभीरच्या तोंडून धोनीचं सत्य आलं बाहेर; म्हणाला 2011 WC फायनमध्ये 97 धावांवर असताना...

विराट कोहली पुढे म्हणाला की, 'सूर्या तू जास्तीजास्त खेळत आहेस तसतसे लोक तुझ्याबाबत विचार करतात की आता सूर्या काय करणार कोणता फटका खेळणार. मी तुला एकच सल्ला देईन की जर तुला डेस्परेट व्हाव असं वाटत असेल त्यावेळी स्वतःला जास्त पूश करण्यापेक्षा दोन पावलं मागे ये.'

यानंतर सूर्या म्हणाला की विराटने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा धावांसाठी भूकेला असणे गरजेचे आहे मात्र खेळाचा आनंद घेणंही खूप महत्वाचं आहे. सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतकी खेळी केली होती. मात्र तरी देखील वनडे संघात त्याला स्थान मिळू शकले नाही.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?