Suryakumar Yadav : 32 चेंडूत अर्धशतक, पुढच्या 17 चेंडूत शतक! सूर्याच्या स्वागताचा VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav
Suryakumar Yadavsakal

Suryakumar Yadav India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना भारताने 65 धावांनी जिंकला आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवचे ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यांचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav

भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्या. टीम इंडियाला ही धावसंख्या गाठण्यात सूर्यकुमार यादवचा सर्वात मोठा हात होता. सूर्याने 51 चेंडूत 11 चौकार आणि 7 गगनाला भिडणाऱ्या षटकारांच्या मदतीने 111 धावांची नाबाद खेळी खेळली. सूर्यकुमार यादवचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे दुसरे शतक होते. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav : न्यूझीलंडच्या ढगाळ वातावरणात सूर्या तळपला; ठोकले वर्षात दुसरे शतक

भारतीय डाव संपल्यानंतर सूर्यकुमार यादवचे ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या खेळीसाठी ऋषभ पंतने प्रथम सूर्याचे मैदानावरच अभिनंदन केले आणि त्यानंतर चाहत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सूर्यकुमार ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाला.

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गडी गमावून 191 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने नाबाद 111 धावांची खेळी केली. ईशान किशनने 36 धावा केल्या आणि हार्दिक-श्रेयसने 13-13 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने तीन आणि लोकी फर्ग्युसनने दोन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात किवी संघ 18.5 षटकांत केवळ 126 धावाच करू शकला आणि 65 धावांनी सामना गमावला. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. अर्शदीप हा एकमेव भारतीय गोलंदाज होता ज्याला एकही विकेट मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com