esakal | नियतीचा खेळ! वाढदिवसाला सुशील कुमार ढसाढसा रडला
sakal

बोलून बातमी शोधा

नियतीचा खेळ! वाढदिवसाला सुशील कुमार ढसाढसा रडला

नियतीचा खेळ! वाढदिवसाला सुशील कुमार ढसाढसा रडला

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती. आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आहे. 26 मे रोजी बुधवारी आपल्या वाढदिवसाला सुशीलकुमार गुन्हे शाखेच्य कार्यालयात ढसाढसा रडल्याचा प्रकार समोर आला आहे. वाढदिवसाला सुशीलकुमारसोबत कुटुंबातील कोणी नव्हतं ना मित्रपरिवारीतील. दरवर्षीप्रमाणे मिळणारे शुभेच्छा मेसेज नव्हते. फक्त काही वेळासाठी भाऊ गुन्हे शाखेत आला होता. या प्रसांगामुळे उद्निग्न झालेला सुशील कुमारला रडू कोसळलं. (sushil kumar cried furiously in crime branch office on his birthday)

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाला गुन्हे शाखेच्या ताब्यात असणाऱ्या सुशालकुमारच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. चेहऱ्यावर उदासीनता होती. सकाळपासूनच तो उद्विग्न झाला होता. जेवणही व्यवस्थित केलं नाही. सुशीलकुमार गुन्हे शाखेच्या कार्यालयात अतिशय त्रस्त दिसत होता. प्रत्येकवर्षी जल्लोषात वाढदिवस साजरा होत होता. मात्र, यंदा तुरुंगात असल्यामुळे काहीच नाही. निरासेच्या गर्तेत सुशीलकुमार गेल्याच चेहऱ्यावरुन दिसत होतं. सुशीलकुमारचा उद्वग्न चेहरा सर्वकाही सांगून जात होता.

हेही वाचा: सुशील कुमारकडून पद्मश्री पुरस्कार परत घेणार?

रविवारपासून सुशील कुमार याची चौकशी केली जात असून प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. गुन्हेशाखेकडून कसून चौकशी होत आहे. वाढदिवसालाही पोलिसांनी आपली प्रश्नउत्तरांचा तास घेतला होता. मात्र, थोड्या कमीप्रमाणात. गुन्हे शाखेच्या कार्यलयात भेटण्यासाठ आलेल्या भावाला पाहून सुशीलकुमार भावूक झाला. डोळ्यातून अश्रू तरंगायला लागले. मात्र, पुढच्याच क्षणाला त्यानं स्व:तला सावरलं.

हेही वाचा: नायक नहीं खलनायक है तू...

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली मॉडल टाउन परिसरातील एका फ्लॅटवरुन दोन्ही गटात भांडणं झाले होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आला होता.