सुशील कुमारला दणका! रेल्वेच्या सेवेतून निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sushil kumar

पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती.

सुशील कुमारला दणका! रेल्वेच्या सेवेतून निलंबित

नवी दिल्ली- पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात (Sagar Dhankar Murder Case) दिल्ली पोलिसांनी रविवारी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला (sushil kumar) अटक केली होती. सुशील कुमार सध्या पोलिस कोठडीत असून त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशील कुमारला उत्तर रेल्वेच्या सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. सुशील कुमार याच्यावरील गुन्हा प्रकरणाचा तपास सुरु आहे, त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित केले जात आहे, असं उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दिपक कुमार यांनी सांगितलं. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Sushil Kumar suspended from his job at Northern Railways Sagar Dhankar Murder Case)

हेही वाचा: wrestler sushil kumar नायक की खलनायक? काय आहे नेमकं प्रकरण?;व्हिडिओ

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली मॉडल टाउन परिसरातील एका फ्लॅटवरुन दोन्ही गटात भांडणं झाले होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आला होता.

Web Title: Sushil Kumar Suspended From His Job At Northern Railways Sagar Dhankar Murder

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sushil Kumar Shinde