Power Lifting Championship : सुश्मिता देशमुखचा पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम; राष्ट्रीय विक्रमासह 3 सुवर्ण व 1 कांस्यपदकाची कमाई

सुश्मिता देशमुखने ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत 136 किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह 3 सुवर्ण 1 कांस्यपदकाची कमाई केली.
sushmita deshmukh
sushmita deshmukhsakal
Updated on

पाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वाघोशी गावची सुकन्या व कळव्यातील विटावा गावात राहणारी सुश्मिता सुनील देशमुखने पंजाबात पार पडलेल्या ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत 136 किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर नोंदवत राष्ट्रीय विक्रमासह 3 सुवर्ण 1 कांस्यपदकाची कमाई केली. तिच्या या कामगिरीमुळे राज्यसह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बुधवारी (ता.19) लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवारा, पंजाब येथे पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या मान्यतेने, एसबीडी इंडियन ओपन क्लासिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 संपन्न झाली. सुश्मिता देशमुख हि सीनियर गटात (52 किलो वजनी गटात) खेळली.

पण स्वतःचे वजन 48.16 किलो होते. 52 किलो वजनी गटात स्क्वॅट या प्रकारात जुना विक्रम 135 किलो होता, त्याला मोडून 136 किलो स्क्वॉट स्वतःच्या नावावर नवीन विक्रम बनवला.

तसेच स्क्वॅट या प्रकारात सुवर्णपदक, बेंच प्रेस या प्रकारात सुवर्णपदक डेडलिफ्ट या प्रकारात कांस्य पदक तसेच 52 किलो वजनी गटात (राष्ट्रीय विजेते) सुवर्णपदक पटकावले,

या आधी सोलापूर येथे झालेल्या सीनियर महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राची सर्वोत्तम महिला खेळाडू 2025 तसेच सुवर्णपदक पटकावले होते. तिच्या या यशाचे श्रेय प्रशिक्षण निलेश नामदेव भोईर, आई-वडील वंदना सुनिल देशमुख, सुनिल आत्माराम देशमुख यांना ती देते.

अनेक अडचणींचा सामना

मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विक्रमांना गवसणी घालणार्‍या सुश्मिता देशमुख हिला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हाँगकाँगला आंतरराष्ट्रीय ओपन पॉवरलिफ्टिींग चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिची निवड झाली होती. मात्र आर्थिक अडचणीमुळे ती या स्पर्धेत भाग घेवू शकली नाही. सुश्मिता देशमुख सारख्या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्वल करणार्‍या या खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com