
लंडन : विम्बल्डन ग्रँडस्लॅम या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या जेतेपदाचा फैसला उद्या शनिवारी (ता. १२) होणार आहे. पोलंडची २४ वर्षीय खेळाडू इगा स्विअतेक व अमेरिकेची २३ वर्षीय खेळाडू अमांडा ॲनिसिमोवा यांच्यामध्ये अजिंक्यपदाची लढत रंगणार आहे.