esakal | T20 World Cup: भारत-पाक सामन्याला मोठी डिमांड, तिकीटं 300 पट महागडी
sakal

बोलून बातमी शोधा

IND-PAK Fans

T20 World Cup: भारत-पाक सामन्याला डिमांड, तिकीटं 300 पट महागडी

sakal_logo
By
सुशांत जाधव

दुबई : टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयसीसीने 3 आक्टोबरपासून स्पर्धेतील तिकीट विक्रीलाही सुरुवात केलीये. कोरोनाच्या संकटामुळे प्रेक्षकांच्या एन्ट्रीवर मर्यादा आहेत. प्रेक्षक क्षमतेच्या केवळ 70 टक्के लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यूएईच्या मैदानात रंगणाऱ्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमधील तिकीटांची किंमत 600 पासून सुरु होते. पण भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हायहोल्टेज सामन्यासाठीचा तिकीट दर 333 पटीने अधिक महागडी आहेत.

आगामी स्पर्धेतील सामने स्टेडियमवर जाऊन पाहण्याची इच्छा असणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना https://www.t20worldcup.com/tickets/buy-tickets या वेबसाईटवरुन तिकीट बुक करता येतील. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 17 आक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 24 आक्टोबरला दुबईच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सर्वात महागडे तिकीट 2 लाखाच्या घरात आहे. सामन्य तिकीटाच्या तुलने ही रक्कम जवळपास 333 पटीनं अधिक आहे.

वेगवेगळ्या स्टँडमधील तिकीटाचे दर वेगवेगळे आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी 12,500 पासून तिकीट दर सुरुवात होतात. याशिवाय 31,200 रुपए आणि 54,100 रुपयांमध्ये फॅन्स प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडचे तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले होते. या तिन्ही वर्गवारीतील सर्व सीट बुक झाल्या आहेत. भारत- पाकिस्तान सामन्यासाठी स्काई बॉक्स आणि व्हीआयपी स्वीट तिकीटाचे दर अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेले नाही.

भारत आणि न्यूजीलंड यांच्यात 31 आक्टोबर रोजी रंगणाऱ्या सामन्यासाठी व्हीआयपी स्वीटचे तिकीट दर 1 लाख 96 हजार रुपये आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटाचे दर हे 2 लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील सर्वात कमी दराची तिकीट ही 10,400 रुपयांना उपलब्ध आहेत.

टी 20 वर्ल्ड कपच्या 7 वा हंगामातील स्पर्धा भारतात होणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धा युएईला स्थलांतरित करण्यात आली. 2016 मध्ये अखेरची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतातच झाली होती. यावेळी वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले होते. यंदाच्या हंगामातील पहिला सामना 17 आक्टोबर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात मस्कटच्या मैदानात रंगणार आहे. याच दिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातही सामने होईल. सुपर-12 मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना 23 आक्टोबरला अबु धाबीच्या मैदानात खेळवण्यात येईल. भारतीय संघ 24 आक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध भिडेल.

स्टेडियम 70 टक्केच भरणार

आयसीसी (ICC) आणि स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या बीसीसीआयने स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी दिली आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही काही निर्बंध आहेत. प्रेक्षक क्षमतेच्या 70 टक्के तिकीट विक्री होणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईच्या मैदानात रंगणार आहे.

loading image
go to top