T20 WC PAKvsAUS : दुसऱ्या सेमी फायनलमध्ये काय घडलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pak vs aus

T20 WC PAKvsAUS : दुसऱ्या सेमी फायनलमध्ये काय घडलं!

PAK vs AUS Live Score ICC T20 World Cup 2021: Wicket by Wicket Commentary of Pakistan vs Australia Match : पाकिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियासमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सलामीवीर मोहम्मद रिझवानचे अर्धशतक 52 (67) आणि फखर झमानने 32 चेंडूत केलेल्या नाबाद 55 धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 176 धावा केल्या आहेत. बाबर आझमने रिझवानसोबत पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. तो 34 चेंडूत 39 धावा करुन बाद झाला. असिफ अलीला खातेही उघडता आले नाही. शोएब मलिक अवघ्या एका धावेची भर घालून परतला. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक दोन आणि पॅट कमिन्स झम्पाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत रंगली आहे. दुबईच्या मैदानातून विजय धडाका सुरु केलेल्या पाकिस्तानने या स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांची विजयी घोडदौड रोखून फायनल गाठणार की? पाकिस्तानच भारी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

2010 नंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा गाठली टी-20 वर्ल्ड कपची फायनल

19 व्या षटकात मेथ्यू वेडने तीन षटकार खेचून पाकिस्तानचा खेळ खल्लास केला

96-5 : ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत, शदाब खान याने ग्लेन मॅक्सवेलला धाडले तंबूत

89-4 : 30 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 49 धावा करुन वॉर्नर माघारी, शदाब खानला मिळाले तिसरे यश

77-3 : शदाब खानला आणखी एक यश, स्मिथ अवघ्या 5 धावा करुन माघारी

52-2 : शदाब खानने मिशेल मार्शलचा खेळ केला खल्लास, त्याने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली.

1-1 : ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात, शाहीन आफ्रिदीनं कर्णधार फिंचला खातेही उघडू दिले नाही

पाकिस्तान निर्धारित 20 षटकात 4 बाद 176 धावा

शोएब मलिकच्या रुपात पाकिस्तान संघाला चौथा धक्का

158-3 : कमिन्सने असिफ अलीला खातेही उघडू दिले नाही

143-2 : मोहम्मद रिझवान अर्धशतकी खेळी करुन माघारी, 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 67 धावा करणाऱ्या रिझवानला स्टार्कने स्टिव्ह स्मिथकरवी झेलबाद केले.

मोहम्मद रिझवानचं आणखी एक अर्धशतक

71-1 : बाबर आझमच्या रुपात पाकिस्तान संघाला पहिला धक्का, त्याने 34 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने केल्या 39 धावा

पावर प्लेमधील पॅट कमिन्सच्या अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळण्याची संधी निर्माण झाली होती. रिझवानता कॅच घेण्याचा चांगला प्रयत्न झम्पाने केला. कॅच अवघड होता पण पुन्हा रिझवान लकी ठरला.

तिसऱ्या षटकातील मॅक्सवलच्या तिसऱ्या चेंडूवर रिझवानने हवेत मारलेला झेल पकडण्याचा वॉर्नरचा प्रयत्न ठरला अपयशी, पाकिस्तानसह रिझवानला यावर चार धावा मिळाल्या.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीनं पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करुन दिलीये

पाकिस्तानी चाहते संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये आल्याचे पाहायला मिळते.

असे आहेत दोन्ही संघ

Pakistan (Playing XI): मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर झमान, मोहम्मद हाफिझ, असिफ अली, शदाब खान, इमाद वासीम, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी।

Australia (Playing XI): डेविड वॉर्नर, अरॉन फिंच (कर्णधार), मिशेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक) पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, अडम झम्पा, जोश हेजलवूड

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top