

Bangladesh vs Scotland, 2nd Match : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पहिल्या फेरीतील ग्रुप ब मधील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने बांगलादेशला पराभवाचा दणका दिलाय. आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये 14 व्या स्थानावर असलेल्या स्कॉटलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 140 धावा केल्या होत्या. रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशला हे आव्हान परतवून लावण्यात अपयश आले. निर्धारित 20 षटकात बांगलादेशला 7 बाद 134 धावांपर्यंतच मजल मारता आली. स्कॉटलंडने हा सामना 6 धावांनी खिशात घालून आपल्या ग्रुपमध्ये रंगत निर्माण केली आहे.
धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. लिटन दास अवघ्या 5 धावा करुन माघारी फिरला. सोमय्या सरकारही 5 धावा करुन परतला. शकिब अल हसन 20, मुस्तफिकर रहिम 38, कर्णधार मुहमदुल्ला 23 आणि हफिफ हुसेन 18 धावा करुन तंबूत परतले. ठराविक अंतराने पडणाऱ्या विकेट्समुळे बांगलादेशच्या अडचणी वाढत गेल्या. ब गटात यापूर्वी ओमान संघाने विजय नोंदवला होता. दुसरीकडे या सामान्यात बांगलादेश विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गटात अव्वल दोनमध्ये राहुन स्पर्धेतील प्रवास कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आता बांगलादेशसमोर उभे राहिले आहे. स्कॉटलंड विरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशचा संघ ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धच्या लढतीत कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
स्कॉटलंडकडून ब्रॅडली व्हिल याने आपल्या कोट्यातील 4 षटकात 24 धावा खर्च करुन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. फलंदाजीत 45 धावांची खेळी करणाऱ्या क्रिस ग्रेव्जने दोन विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला त्यालाच सामनावीरचा बहुमान मिळाला. याव्यतिरिक्त जोश डॅव्ही आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
सुपर-12 राउंडमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी 8 संघ क्वॉलिफायर राउंडमध्ये भिडणार आहेत. ग्रुप अ मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नामीबीया आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे. तर ब गटात बांगलादेश, ओमान, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या दोन गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.