esakal | T20 World Cup: टीम इंडियाच्या घोषणेतील ३ उल्लेखनीय गोष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Rohit-Dhoni

T20 World Cup: 'टीम इंडिया'च्या घोषणेतील ३ उल्लेखनीय गोष्टी

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय संघ जाहीर झाल्यावर तीन गोष्टींची सर्वाधिक चर्चा रंगली

T20 World Cup 2021: टी२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. भारताचा या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या गटात पाकिस्तान व्यतिरिक्त न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे दोन संघही असणार आहेत. त्यासह आणखी दोन संघ पात्रता फेरीनंतर या गटात दाखल होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची बुधवारी घोषणा झाली. संघात काही अपेक्षित खेळाडूंना स्थान मिळाले. तर काही खेळाडूंच्या बाबतीत अनपेक्षित निर्णयही घेण्यात आले. पाहूया संघ निवडीतील तीन उल्लेखनीय गोष्टी...

१. शिखर धवन संघाबाहेर

शिखर धवन हा भारतासाठी एक सातत्यपूर्ण खेळी करणारा सलामीवीर आहे. निर्धारित षटकांच्या सामन्यात धवन खूप चांगल्या लयीत होता. भारताचा श्रीलंकेविरूद्ध खेळणारा टी२० संघ त्याच्याच नेतृत्वाखाली खेळला होता. त्या मालिकेत धवन हा सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरा होता. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना धवनने दमदार खेळी केली होती. त्यामुळे शिखरला संघातून वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Shikhar Dhawan

Shikhar Dhawan

२. अश्विनला अनपेक्षित संधी

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत सर्वाधिक चर्चा होत होती रविचंद्रन अश्विनची. अश्विनला संघात स्थान न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. पण यंदाच्या टी२० विश्वचषक संघात अश्विनला संघात स्थान मिळाले. अतिशय अनपेक्षित असा हा निर्णय असल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले. गेल्या चार वर्षात अश्विन कसोटी क्रिकेट व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे या निर्णयाची चांगलीच चर्चा आहे.

MS-Dhoni-R-Ashwin

MS-Dhoni-R-Ashwin

३. टीम इंडियासोबत पुन्हा धोनी

भारतीय संघाची घोषणा झाली आणि त्यासोबतच अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. भारताचा माजी कर्णधार आणि सर्व प्रकारच्या ICC स्पर्धा जिंकणारा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याला टीम इंडियासोबत मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉरच्या भूमिकेत समाविष्ट करण्यात आले. टी२० विश्वचषकाआधी युएईच्या मैदानांवर IPLचे सामने होणार आहेत. त्यात धोनी CSKचे नेतृत्व करणार आहे. खेळपट्टी आणि खेळाचा अंदाज अचूकपणे घेणारा खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी. त्यामुळे धोनीने निवृत्ती घेतली असली तरी त्याला संघात मेंटॉर म्हणून स्थान देण्याच्या निर्णयाची सर्वाधिक चर्चा आहे.

loading image
go to top